भारताला शक्‍तीशाली व स्थिर पाकिस्तान हवा

भारताला शक्‍तीशाली व स्थिर पाकिस्तान हवा
04-01-2008
भारत अस्थिर असतांना प्रणव मुखर्जी असे म्हणतात
नवी दिल्ली, ४ जानेवारी (प्रे.ट्र.) - पाकिस्तानमध्ये `जिहादी शक्‍ती'च्या हातात आण्विक शस्त्रास्त्रे पडली आहेत. पाकिस्तानमध्ये जिहादी शक्‍तींचा दहशतवाद पसरल्याबद्दल पाश्चिमात्य देशांनी चिंता व्यक्‍त केली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्‍त करतांना भारताचे परराष्ट्रमंत्री श्री. प्रणव मुखर्जी यांनी भारताला शक्‍तीशाली व स्थिर पाकिस्तान हवा असल्याचे सांगितले.
(भारतातील आतापर्यंतच्या सर्व दहशतवादी हल्ल्यांत पाकिस्तानचा हात असल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत. असा दहशतवादी देश शक्‍तीशाली होण्याची अपेक्षा ठेवणारे काँग्रेस (नव्हे भारतीय मुस्लीम लिग) सरकार देशाशी प्रतारणाच करत आहे. अशा काँग्रेसच्या देशद्रोही नेत्यांना नष्ट नाही केले, तर उद्या पाकिस्तानने देश बळकावलेला पहावा लागेल ! - संपादक)पाकिस्तानमधील सध्याच्या अराजक स्थितीतून तेथील जनता लवकरच बाहेर पडेल, असा विश्‍वास श्री. मुखर्जी यांनी व्यक्‍त केला. (भारताला लाभलेले दूधखुळे परराष्ट्र मंत्री ! अर्थात ते काँग्रेसचे (नव्हे भारतीय मुस्लीम लिगचे) मंत्री असल्यामुळे मुसलमानांचे ते हितचिंतक आहेत. -संपादक) ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींशी बोलत होते. पाकिस्तानचे अध्यक्ष जन. परवेझ मुशर्रफ यांनी तेथील स्थिती नियंत्रणाखाली आणल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले. (पाकिस्तानचे गोडवे गाणारे भारतातील षंढ राज्यकर्ते ! - संपादक)

No comments: