`अखिल भारतीय संस्कृत परिषदे'ची सुरुवात व शेवट जगन्मान्य वेदांतील श्लोकांनी करण्यास मज्जाव !
वेदांतील श्लोकांचा दुस्वास करून `गाढवाला गुळाची चव काय', ही म्हण सार्थ करणारी एन्.सी.इ.आर्.टी. !
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा हिंदुद्वेष !
नवी दिल्ली, २८ जानेवारी (वार्ता.) - राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.) `भाषाशास्त्र' या विभागाच्या अंतर्गत `राष्ट्रीय संस्कृत प्रकल्प' राबवण्यात येतो. या प्रकल्पाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या `अखिल भारतीय संस्कृत परिषदे'ची सुरुवात व शेवट जगन्मान्य असलेल्या वेदांतील श्लोकांनी करण्यास परिषदेच्या भाषाशास्त्र विभागाच्या प्रमुखांनी मज्जाव केला.
(कुठे सिनेटची सुरुवात वैदिक मंत्रांच्या घोषात करणारे ख्रिस्तीअमेरिकी, तर कुठे संस्कृत परिषदेची `सुरुवात व शेवट' वेदमंत्रांनी करण्यास नकार देणारी वेद आणि संस्कृत यांचा तिरस्कार करणारी हिंदुबहुल भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ! - संपादक) `भारतात सर्वत्र संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा', या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात येतो. (ज्या प्रकल्पातील परिषदेच्या सुरुवातीस संस्कृत मंत्र म्हणण्यास मज्जाव आहे, तो प्रकल्प म्हणे संस्कृत भाषेचा प्रसार करणार ! एवढा मोठा दुर्दैवी विनोद केवळ भारतातच होऊ शकतो ! - संपादक) सदर `अखिल भारतीय संस्कृत परिषदे'ची सुरुवात व शेवट वेदांतील श्लोकांनी करण्याचे ठरले होते. या कार्यक्रमाचा आराखडा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे `भाषाशास्त्र' विभागाचे प्रमुख डॉ. रामजनम शर्मा यांना दाखवण्यात आला. तेव्हा त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात व शेवट वेदांतील श्लोकांनी करण्यास मज्जाव केला. (`वेदांतील श्लोक म्हणजे जगाला लाभलेला अमूल्य ठेवा आहे', असे सांगत `युनेस्को'ने त्यांचा गौरव केला. असे असतांना वेदांचे महत्त्व न समजणारी प्रा. शर्मा यांच्यासारखी व्यक्ती राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत महत्त्वाच्या पदावर आहे, यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते ? - संपादक) याबाबत राष्ट्रीय संस्कृत प्रकल्पाच्या शिक्षकांनी प्रा. शर्मा यांच्याकडे वारंवार विनवणी केली; मात्र त्यांनी शेवटपर्यंत श्लोक म्हणण्यास मान्यता दिली नाही. (`संस्कृत ही मृत भाषा आहे', असे म्हणणारे काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे हिंदुद्रोही वारसदार व मित्रपक्ष यांच्या हाती राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा कारभार असतांना आणखी वेगळे काय होणार ? वेदांचा व पर्यायाने संस्कृत भाषेचा अपमान करणारी काँग्रेस व तिचे मित्रपक्ष यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन कृती करावी ! - संपादक) त्यामुळे `अखिल भारतीय संस्कृत परिषदे'ची सुरुवात व सांगता वैदिक श्लोकांनी होऊ शकली नाही. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मुख्य व्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आली; मात्र त्यांनी तिची दखल घेतली नाही. (हिंदूंनो, या समस्त धर्मद्रोह्यांना लक्षात ठेवा ! संस्कृतद्वेष्टी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद बरखास्त करण्याची वेळ आता आली आहे ! - संपादक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment