`जोधा अकबर' चित्रपटातील केवळ ३० टक्के भाग खरा ! - इतिहासद्रोही दिग्दर्शक गोवारीकर यांची कबुली
हिंदूंनो, काल्पनिक कथांवर चित्रपट काढून हिंदूंच्या भावना पायदळी तुडवणार्या इतिहासद्रोही दिग्दर्शकाला धडा शिकवा !
मुंबई - ``जोधा अकबर' चित्रपटातील ३० टक्के भाग हा खरा आहे, तर उर्वरित ७० टक्के भाग काल्पनिक आहे. प्रेम व प्रणयकथा ही माझी कल्पना आहे, तर ३० टक्के भाग हा इतिहासातील पुस्तकांमधून घेतला आहे', अशी कबुली `जोधा अकबर' चित्रपटाचे इतिहासद्रोही दिग्दर्शक श्री. अशुतोष गोवारीकर यांनी दिली आहे.
(इतिहासद्रोही दिग्दर्शक गोवारीकर यांना हिंदूंच्या भावना पायदळी तुडवणार्या कल्पना कशा सुचतात ? हिंदू षंढ असल्यामुळेच हे धर्मद्रोही असले कृत्य करण्यास धजावतात. इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या असत्या, तर असे विधानही करायला गोवारीकर उरले नसते. - संपादक) एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.चुकीचा इतिहास समाजात पोहोचत असल्याने चित्रपटाला विविध स्तरांवरून वाढता विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. गोवारीकर यांची वरील मुलाखत घेण्यात आली. हा चित्रपट मान व प्रतिष्ठा राखून प्रेम विविध अडथळे कसे पार करू शकते, हेच दर्शवतो. (अकबर हा कामांध, लंपट व हिंदुद्वेष्टा होता. `जोधा अकबर' चित्रपटामध्ये अकबराला `हिंदु-मुसलमान ऐक्यासाठी झटणारा प्रेमवीर असा दर्शवून, लोकांना चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. प्रेमाचेच उद्दात्तीकरण करायला आणखी विषय नव्हते का ? - संपादक) चित्रपट तयार करण्यासाठी जे इतर जण हाताळतात तीच पुस्तके मीही हाताळली आहेत. यासंबंधी मी पुरेपूर संशोधन केले आहे. (आतापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांनी चुकीचाच इतिहास जनतेच्या माथी मारला आहे. त्यामुळे गोवारीकर खरा इतिहास जनतेला कधी समजलेलाच नाही. यासाठी गोवारीकर यांनी थोर इतिहासकार पु.ना. ओक वगैरेंच्या इतिहासाचा अभ्यास करावा. - संपादक) जोधपूर येथील जोधाबाईच्या वंशाजांचीही आपण परवानगी घेतली आहे. आपल्या संशोधनानुसार राजा बारामल्लाची कन्या जोधा यांना इतिहासकार हरीकबाई, जियारानी, सहीबाई व मानमती या नावांनी संबोधित होते. यासाठी आपण के.एल्. खरना लिखित `मिडीवल इंडिया', मुनिलाला लिखित `अकबर', शिखाजाई लिखित `प्रिन्स्ली टेरन्स', रूमेन गोडेन लिखित `गुलबदन' व सुबद्रा सेन गुप्ता लिखित `ए प्रिन्सेस डायरी' या पुस्तकांचा वापर केला आहे. इतिहास प्रत्येक ५० वर्षांनी पुन्हा लिहिला जातो आणि आता तर इतिहासकार मूळ सार तेच ठेवून त्यांच्या स्वत:च्या कल्पना व स्वत:चा अर्थ लावून पुस्तके लिहितात. (ही आहे भारतीय इतिहासाची दुर्दशा ! - संपादक) जोधा ही अकबरची सून नव्हती का ? या प्रश्नाला उत्तर देतांना श्री. गोवारीकर म्हणाले, ``मला काय वेड लागले आहे का सासरा व सून यांची प्रेमकहाणी दाखवायला ?''श्री. गोवारीकर त्यांच्या मुलाखतीत पुढे म्हणाले, ``प्रत्येकाने हा चित्रपट पहावा व मग आपले मत ठरवावे, अशी माझी इच्छा आहे. (खोट्या व हिंदुद्रोही इतिहासाद्वारे लोकांची दिशाभूल करून पैसा कमावण्याचा अधिकार गोवारीकर यांना कोणी दिला ? - संपादक) आपला हा चित्रपट करमणूक करणारा आहे. (हिंदूंच्या भावनांशी खेळणे हे गोवारीकर यांना करमणुकीचे साधन वाटते. हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्यानेच कोणीही उठतो हिंदूंच्या भावनांशी खेळतो ! - संपादक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment