ख्रिस्ती शाळेत शालेय वह्यांसोबत होणारी िख्र्स्ता्री पुस्तकांची विक्री शिवसेनेने थांबवली !
06-06-2008
-->
जळगाव, ६ जून (वार्ता.) - येथील एका ख्रिस्ती शाळेत शाळेतील वह्यांसोबत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी पुस्तकांची जबरदस्तीने करण्यात येत असलेली विक्री शिवसेनेने बंद पाडली.
(ख्रिस्ती धर्माच्या पुस्तकांची अवैधपणे होणारी विक्री थांबवणार्या शिवसेनेचे अभिनंदन ! - संपादक) ही विक्री पूर्णपणे अवैध असल्याचे शिक्षणाधिकार्यांनी मान्य केले. (शिक्षणाधिकार्यांनी केवळ मान्य करून न थांबता या शाळेचा परवाना रद्द करायला हवा. - संपादक)सेंट लॉरेन विद्यालयात शाळेच्या वह्यांसोबत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी पुस्तके विकत असल्याची माहिती एका जागरूक पालकाने येथील शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. गजानन मालपुरे यांना दूरध्वनीद्वारे दिली. (असे जागरूक पालक सर्वत्र हवेत. - संपादक) श्री. मालपुरे यांनी शिवसैनिकांसह घटनास्थळी पोहोचून शहानिशा केली असता त्यांना ही विक्री अवैध असल्याचे आढळले. त्यांनी तत्परतेने शिक्षणाधिकारी व पोलिसांना दूरध्वनी करून घटनास्थळी पाचारण केले. तेव्हा शाळेत पावती देऊन शाळेसमोरच्या एका घरातून या साहित्याची विक्री होत असल्याचे पोलीस व शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आले. त्यानंतर या घटनेचा पंचनामा करण्यात आला आणि या घराला टाळे लावले.श्री. गजानन मालपुरे यांनी शाळेची पाहणी केली असता या शाळेत एकाही राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र लावण्यात आले नव्हते. (अशा शाळांमध्ये राष्ट्राभिमानी विद्यार्थी काय घडवले जाणार ? - संपादक) शाळेतील विद्यार्थिनींना कपाळावर टिकली लावू न देणे, हातात बांगड्या घालू न देणे,मुलांना टिळा लावू न देणे व तसे करणार्याला दंड वा शिक्षा करण्यात येते, असे प्रकार होत असल्याचेही श्री. मालपुरे यांना कळले. (यातून ख्रिस्ती शाळांचा हिंदुद्वेष्टेपणा सिद्ध होतो. निधर्मीपणाच्या नावाखाली ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेस आघाडी सरकारला ख्रिस्त्यांचा हा हिंदुद्वेष्टेपणा दिसेल काय ? - संपादक) त्यामुळे दुसर्या दिवशी त्याची शहानिशा करायला ते शाळेत गेले असता त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. ``शाळेत पंधरा दिवसांत श्री सरस्वतीच्या मूर्तीची स्थापना न झाल्यास सोळाव्या दिवशी आम्ही स्थापना करू'', असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment