सत्य मजकुरामुळे मुसलमानांना राग

हिंदूंवर मुसलमानांनी केलेल्या अत्याचारांबद्दलच्या मजकुरामुळे मुसलमानाकडून हिंदु विद्यार्थ्याशी मारामारी !
15-08-2008

मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) - एका वहीवरील मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची माहिती हिंदु विद्यार्थ्याने सर्व विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवल्यामुळे एका मुसलमान विद्यार्थ्याला राग आला व त्याने हिंदु विद्यार्थ्याशी मारामारी केली.
(या देशात आता खरे बोलणे, हादेखील अपराध झाला आहे ! - संपादक) हे प्रकरण महाविद्यालयाने बदनामीच्या भीतीने मिटवले आहे. असली भयग्रस्त महाविद्यालये पुढील पिढीला स्वार्थांध व नेभळट बनवतील, यात शंका नाही ! - संपादक)
एका महाविद्यालयात हिंदु धर्माच्या संदर्भात माहिती असणारी वही एक हिंदु विद्यार्थी वापरतो. त्या वहीवर मुसलमानांकडून हिंदूंवर करण्यात आलेल्या अत्याचारांची माहिती देण्यात आली आहे. `ती वही वापरू नको', अशी धमकी एक मुसलमान विद्यार्थी सदर हिंदु विद्यार्थ्याला पूर्वीपासून देत असे. त्याला त्या हिंदु विद्यार्थ्याने कधीच दाद दिली नाही. काही दिवसांपूर्वी त्या हिंदु विद्यार्थ्याने त्या वहीवरील तो मजकूर सर्व विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवला. त्यामुळे मुसलमान विद्यार्थ्याला राग आला. (यात मुसलमान विद्यार्थ्याला राग येण्याचे काय कारण ? हा विद्यार्थी तर स्वतंत्र व धर्मनिरपेक्ष भारतात जन्माला आला आहे. उलट त्याला हिंदूंवर झालेल्या अत्याचारांची चीड यायला हवी होती. तशी ती आली नाही, याचाच अर्थ हा विद्यार्थी व त्याच्यावर संस्कार करणारे त्याच्या आजूबाजूचे घटक प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्याच चष्म्यातून पहात असावेत. अशाने या देशात राष्ट्रीय एकात्मता कधीतरी साधली जाईल का ? - संपादक) त्याने हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हा दोघांमध्ये मारामारी झाली. या वेळी लगेचच शिक्षक धावून आले. एका शिक्षकाने त्या मुसलमान विद्यार्थ्याला समजावले, ``प्रत्येकाला अभिव्यक्‍ती व धर्म स्वातंत्र्य आहे. जो इतिहास आहे, तोच या वहीवर लिहिला आहे. तुम्हीही तुमच्या धर्माचे काही आणले, तर कोणी काही बोलते का ? हे प्रकरण येथेच विसरा. बाहेर कुणाशी बोललात, तर दंगल घडू शकते. त्यामुळे महाविद्यालयाची बदनामी तर होईलच, शिवाय तुम्हालाही आम्ही निलंबित करू.''
त्यानंतर शिक्षकवृंदाची बैठक झाली. त्यांनी सदर घटना कोणालाही न सांगण्याचे ठरवले. या महाविद्यालयात १ हजार ५०० हिंदू व २०० मुसलमान विद्यार्थी आहेत. शहरात मात्र सुमारे ४० टक्के वस्ती मुसलमानांची असल्याने या प्रकरणी गुप्‍तता पाळण्यात येत आहे. (अशी गुप्‍तता पाळावी लागते, ही बाब धर्मनिरपेक्ष राष्ट्राला शोभते का ? अशा राष्ट्राला जगात कुणी धर्मनिरपेक्ष म्हणील का ? - संपादक) याबाबत त्या हिंदु विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले, ``वहीवरील सत्य मजकुरामुळे मुसलमानांना राग येण्याचे कारण नाही. महाविद्यालयात कोणीही अशी जात्यंधता दाखवणे, हे सामाजिक दृष्टीकोनातून इष्ट नव्हे.'

No comments: