गंगाखेड (जिल्हा परभणी) येथे मुसलमानांकडून मंदिरांवर दगडफेक

गंगाखेड (जिल्हा परभणी) येथे मुसलमानांकडून मंदिरांवर दगडफेक !
08-08-2008

* विहिंपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला * पोलिसांचा लाठीमार
गंगाखेड (जिल्हा परभणी), ८ ऑगस्ट - येथील गंगाखेड शहरात बुधवारी दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर मुसलमानांनी मंदिरांवर दगडफेक केली. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेच्या शहराध्यक्षांसह ४ जण जखमी झाले. त्यामुळे संतप्‍त झालेल्या हिंदूंनी आंदोलन केले. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला. या लाठीमारात ५ जण जखमी झाले.

नागपंचमीच्या दिवशी येथील भगवती चौकातील वादग्रस्त पानपट्टीजवळ एका हिंदूचे मुसलमानाबरोबर भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. (हिंदूंचे सण आले की, नेहमीच अशा मारामार्‍या व दंगली कशा होतात ? - संपादक) त्यानंतर मुसलमानांच्या सुमारे १५० जणांच्या गटाने भगवती व स्वामी समर्थ यांच्या मंदिरांवर दगडफेक केली. (आपापसांत मारामारी झाली, तर मंदिरांवर दगडफेक करण्याचे कारण काय ? - संपादक) त्याच वेळी त्यांनी तीन दुचाक्या व एक चारचाकी यांची तोडफोड केली आणि एक मोटरसायकल जाळण्याचा अयशस्वी प्रयत्‍न केला. त्यानंतर त्यांनी विहिंपचे श्री. संजय अनावडे यांच्यावर तलवार, लोखंडी सळई व पाईप यांच्यासह हल्ला केला. तलवारीचा वार डोक्यात केल्याने श्री. अनावडे रक्‍तबंबाळ झाले.

ही घटना हिंदुत्ववादी संघटनांना समजताच त्यांनी काल सकाळी `शहर बंद'चे आवाहन केले. दुकानदारांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारो हिंदूंनी तहसील कार्यालयासमोर जाऊन जोरदार निदर्शने केली. तहसीलदार श्री. भालचंद्र चाकूरकर यांना दिलेल्या निवेदनात भगवती चौकातील पानपट्ट्या हटवाव्यात, रिक्शा थांबा हालवावा, अशा मागण्या करण्यात आल्या. भगवती चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता तेथे असणारा एक झेंडा काढण्यासाठी चढल्यावरून पोलीस व हिंदू यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराची नळकांडी फोडली. या वेळी एक वृद्ध आणि ६ तरुण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर आमदार श्री. संजय जाधव यांच्यासह हिंदुत्ववादी नेते व प्रमुख यांनी शांततेचे आवाहन केले. सध्या शहरात तणाव कायम असून पोलिसांनी या प्रकरणी १८ जणांना अटक केली आहे. शांतताभंग करणार्‍या ३५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी श्री. संजय अनावडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, `बुधवारी रात्री अकराच्या सुमारास अखिल, खालेद, जयू जयस्वाल व पिंटू जयस्वाल यांच्यासह इतर ३४ जणांनी परिसरात दगडफेक केली; तसेच खालेद याने डोक्यात तलवारीने वार केला. या वेळी त्यांनी सळई, पाईप आदींचा वापर केला.'

No comments: