टाइम्स ऑफ इंडिया'च्या विरोधात तक्रार दाखल

`टाइम्स ऑफ इंडिया'च्या विरोधात हिंदु धर्माभिमानी द्वैपायन वरखेडकर यांच्याकडून तक्रार दाखल !
21-05-2008

श्रीराम व मारुति यांच्या विडंबनाचे प्रकरण `दैनिक सनातन प्रभात'मधील बातमीचा परिणाम !
पंढरपूर, २१ मे (वार्ता.) - `दी टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राने कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे आणि रामसेतूच्या अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याचे वृत्त आज `दैनिक सनातन प्रभात'मध्ये प्रसिद्ध झाले. या व्यंगचित्राबद्दल येथील हिंदु धर्माभिमानी व हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे श्री. द्वैपायन वरखेडकर यांनी व्यंगचित्रकार जग सुरैय्या व अजित निनान यांच्यासह `दी टाइम्स ऑफ इंडिया'चे मालक, मुद्रक, प्रकाशक व संपादक यांच्या विरोधात पंढरपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (`दैनिक सनातन प्रभात'मधील वृत्त वाचून धर्महानी करणार्‍यांच्या विरोधात तत्परतेने पोलिसांत तक्रार दाखल करणारे हिंदु धर्माभिमानी श्री. द्वैपायन वरखेडकर यांचे अभिनंदन ! श्री. वरखेडकर यांच्या या कृतीतून बोध घेऊन इतरत्रचे हिंदूही कृतीशील बनतील, तो सुदिन ! - संपादक) याबाबत श्री. वरखेडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, `दैनिक सनातन प्रभात'ने दिलेल्या वृत्तावरून सदर तक्रार करण्यात आली आहे. मुंबई येथील महानगर पोलीस आयुक्‍तांनाही पाठवलेल्या या तक्रारीत म्हटले आहे की, प्रभु श्रीरामाविषयी विकृत मजकूर छापणे व तो प्रसिद्ध करणे, हे गुन्हेगारी कृत्य आहे. श्रीराम माझे व समस्त हिंदु धर्मियांचे आराध्यदैवत आहे. त्यांच्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. आमच्या आराध्यदैवतांची व्यंगचित्रे काढण्याची परवानगी त्यांना कोणी दिली ? परधर्मियांच्या श्रद्धास्थानांचे असे चित्र काढण्याची हिंमत सदर चित्रकार दाखवील का ? काढल्यास `दी टाइम्स ऑफ इंडिया' ते प्रसिद्ध करील का ? तसे जर होणार नसेल, तर हिंदूंच्याच श्रद्धास्थानांची अशी व्यंगचित्रे का काढली जातात ? `दी टाइम्स ऑफ इंडिया' या दैनिकाने त्याच्या १३ मे रोजीच्या अंकात सदर व्यंगचित्र प्रसिद्ध करणे, ही घटनाच संतापजनक आहे. हे गुन्हेगारी कृत्य आहे. समस्त हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान करणारी ही बाब आहे.

No comments: