कोल्हापूरमध्ये मुसलमानांच्या वाढत्या कारवायांना शह देणारा धर्माभिमानी बजरंग दल !
कोल्हापूरमध्ये मुसलमानांचा वाढता उच्छाद व त्याला शह देणार्या बजरंग दलाच्या कारवाया यांवर प्रकाशझोत टाकणार्या काही घटना येथे देत आहोत.
कोल्हापुरातील उप-कारागृह म्हणजे आपलीच मालमत्ता असल्यासारखे वागणारे मुसलमान आणि त्यांना मदत करणारे राष्ट्र व धर्म द्रोही शासकीय अधिकारी ! `कोल्हापुरातील उप-कारागृहात (सब-जेलमध्ये) हनुमानाचे मंदिर व दर्गा असे दोन्ही आहेत. कारागृहाच्या आवारातच हनुमानजयंती व उरुस साजरा केला जायचा. हळूहळू या उरुसाचे प्रस्थ वाढत गेले. उरुसाच्या दिवशी एखादा राजवाडा असावा, अशा थाटात कारागृहाच्या प्रवेशद्वाराला रोषणाई करण्यात आली होती. कारागृहाच्या दर्शनी भागावर उरुसाच्या दर्शनासाठी सर्व मुसलमान भाविकांना `जाहीर निमंत्रणा'ची पाटी झळकत होती. कारागृहाच्या आवारात कोणालाही प्रवेशाची परवानगी नसतांना, बाहेरची पाहुणे मंडळी कारागृहात घुसली व दर्ग्याचे दर्शन घेऊ लागली. उरुस म्हणजे त्यात बकर्यांचा बळी आलाच. सोबतीला `थोडीशी' असली, म्हणजे झाले ! अर्थात त्यासाठी लागणारा पैैसा वर्गणीतून गोळा करण्यात आला होता. १०० रुपये प्रत्येकी ! या सर्व प्रकारात पोलीसच प्रचंड उत्साहाने सहभागी झाले होते, यात काहीच शंका नाही. तेव्हाचे कारागृहाचे अधिकारी (जेलर) श्री. कळमकर यांची या सर्व प्रकारांना खास चिथावणी होती.' (सांस्कृतिक वार्तापत्र, २६ जानेवारी २००७, पृष्ठ क्रमांक ५४)(कोल्हापुरातील उप-कारागृहात जे झाले, तेच थोड्याफार फरकाने संपूर्ण देशभरात होत असल्याचे लक्षात येते. यावरून जनतेनेच बोध घेऊन संघटित व्हायला हवे. आता रात्रच नव्हे, दिवसही वैर्याचा आहे ! - संकलक)बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय व त्याचा परिणाम `या सहभोजनाच्या आयोजनाला अटकाव करायचा, तर तो कायमचा', असे ठरले. कारागृहाच्या आत गल्लीतील सर्व भाविक मंडळी वरील अपेयपानाचा आस्वाद घेत असतांना, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी `आपला `अवतार' दाखवायचा', असे ठरवले. कारागृहाच्या दरवाजांपाशी सुमारे १०० कार्यकर्त्यांचा गट जमा झाला. दरवाजे ओढून बंद करण्यात आले. दरवाज्यांना बाहेरून कड्या लावण्यात आल्या. दरवाजेच बंद केल्यामुळे बाहेरची मंडळी बाहेर व आतली मंडळी आत अडकली. दरवाज्यापाशीच बजरंगींनी धरणे सुरू केले. प्रचंड घोषणाबाजी झाली. सुमारे तासभर जोरदार घोषणाबाजी झाल्यानंतर प्रकरण फार चिघळायच्या आत पोलीस उप-निरीक्षक (डी.वाय.एस्.पी.) श्री. मनोज पाटील यांना कळवण्यात आले. पोलीस पथक हजर होईपर्यंत दरवाजात बजरंगी ठाण मांडूनच बसले होते. कारागृहाच्या आत असलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या अटीवरच बजरंगींनी दरवाजा सोडण्याचे मान्य केले. ही मागणी मान्य करणे पोलीस अधिकार्यांना क्रमप्राप्त होते. कारागृहाच्या प्रमुखांंसह सर्व पोलीस व जमलेले सर्वजण दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा प्रचंड गाजावाजा झाला. कारागृहाच्या आत कोणत्याही धार्मिक कार्याला परवानगी नाकारण्यात आली. पोलीस उप-निरीक्षक श्री. मनोज पाटील यांनी कारागृहाचे प्रमुख आणि प्रमुख अधिकारी यांची चांगलीच हजेरी घेतली. या प्रकरणानंतर गेल्या ५ वर्षांत या उप-कारागृहातील उरुस बंद आहे. हिंदू संघटनांनी एकत्रितपणे आणि संयमितपणे घेतलेल्या भूमिकेमुळे अनिष्ट प्रथेला वेळीच आवर घातला गेल्याचे आदर्श उदाहरण कोल्हापुरकरांनी अनुभवले.' (सांस्कृतिक वार्तापत्र, २६ जानेवारी २००७, पृष्ठ क्रमांक ५४)(राष्ट्र व धर्म विरोधी कृत्य करणारे शासकीय अधिकारी व राष्ट्रविरोधी कारवाया करून या देशावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्नात असलेले कावेबाज मुसलमान यांच्या कारवायांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न करणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! अशी तत्परता दाखवण्याचे शहाणपण शासकीय अधिकार्यांना सुचेल तो सुदिन ! - संकलक)मुसलमान वसाहतीतील वसतीगृहाला अनुदान देणारे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांचा धिक्कार ! `मुसलमान वसाहतीतील एका निवासी वसतीगृहाला मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी १५ लाख रुपये अनुदान दिले. उद्घाटनाच्या दुसर्या दिवशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजले की, वसतीगृहातील संडासांच्या दरवाजांच्या मुठींवर गणपतीचे चित्र आहे. त्याच दिवशी वसतीगृहासमोर निदर्शने झाली. पोलिसांच्या समोर गणपतीची चित्रे असलेले दरवाजे दाखवण्यात आल्यावर, वसतीगृहाच्या चालकांनी स्वत: येऊन माफी मागितली आणि दरवाजांच्या मुठी बदलण्यात आल्या. हिंदुत्वाला अपमानकारक अशी कोणतीही गोष्ट न करण्याचे या मुसलमान कार्यकर्त्यांनी मान्य केले.' (सांस्कृतिक वार्तापत्र, २६ जानेवारी २००७, पृष्ठ क्रमांक ५४)(वसतीगृहातील संडासांच्या दरवाजांच्या मुठींवरील गणपतीचे चित्र काढायला लावणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! जी जागरूकता देशातील नेते व राजकीय पुढारी यांनी दाखवायला हवी, ती जनतेलाच दाखवावी लागत आहे ! - संकलक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment