बांगलादेशी घुसखोरांबाबतचे वास्तव

बांगलादेशी घुसखोरांबाबतचे वास्तव !

मुंबईत घुसखोरी करणार्‍या बांगलादेशींची संख्या प्रचंड वाढली आहे. भारताच्या सीमेला लागूनच असलेल्या या राष्ट्रातून गेली ३६ वर्षे देशाच्या शहरी भागात रहाणार्‍या लहानमोठ्या प्रमाणातील घुसखोरीने आता उग्र रूप धारण केले आहे. बांगलादेशींचा दहशतवादी कारवायांकरिता देशविघातक शक्‍तींकडून होत असलेला वापर देशांतर्गत सुरक्षा यंत्रणांसमोर मोठी डोकेदुखी ठरू पहात आहे.
सीमावर्ती भागातून होणारी घुसखोरी रोखण्याकरिता भारतातील सुरक्षायंत्रणांनी वारंवार प्रयत्‍न केले; मात्र सीमा सुरक्षादल, स्थानिक पोलीस यंत्रणा, बांगलादेश रायफल्सचे जवान आणि काही दलालांच्या मदतीने ही घुसखोरी दिवसेंदिवस वाढतच गेली. भारतातील रोजगाराच्या संधीमुळे हे लोक सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या नकळत अथवा त्यांना काही पैसे देऊन भारतात शिरतात. अनेक वर्षांपासून या लोकांना भारतात अवैधरीत्या पाठवणार्‍या दलालांचे रॅकेट कार्यरत आहे. दलालाला एका माणसामागे किमान पाचशे रुपये दिले, तरी तो या घुसखोरांना हवी ती मदत करतो. - के.एल. प्रसाद, सह पोलीस आयुक्‍त (कायदा आणि सुव्यवस्था), मुंबई पोलीस (संदर्भ : दैनिक सकाळ)

No comments: