शाहीन-२ या सर्वांत लांब क्षेपणास्त्राची चाचणी
19-04-2008
पाकिस्तानमधील नव्या सरकारचा भारतविरोधी प्रताप !
इस्लामाबाद - पाकिस्तानने आज त्याच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या `शाहीन-२' या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. २ हजार कि.मी. अंतराचा पल्ला गाठू शकणार्या या क्षेपणास्त्रामुळे भारतातील अनेक शहरे पाकिस्तानी मार्याच्या टप्प्यात येऊ शकतात.
हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेचे आहे. `पाकिस्तानच्या या चाचणीला भारत जास्त महत्व देत नाही. जगातील कोणत्यातरी कोपर्यातून तंत्रज्ञान येत असते, त्यामुळे त्याची चाचणी घ्यावी लागते', असे प्रतिपादन देशाचे नौदलप्रमुख श्री. सुरेश मेहता यांनी केले. (शत्रूराष्ट्राच्या शस्त्रसज्जतेबाबत भारताच्या संरक्षणकर्त्यांनी असा दृष्टीकोन बाळगणे राष्ट्रहिताचे आहे का ? - संपादक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment