पाकिस्तानमध्ये जाणार्‍या दहशतवाद्यांना सरकारने वाट मोकळी करून द्यावी

देशद्रोही मुफ्ती महंमद सईद म्हणतात, ``पाकिस्तानमध्ये जाणार्‍या दहशतवाद्यांना सरकारने वाट मोकळी करून द्यावी !''
19-04-2008

फोंडा, १९ एप्रिल (वृत्तसंस्था) - काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी, ``पाकिस्तानमध्ये जाणार्‍या दहशवाद्यांना सरकारने वाट मोकळी करून द्यावी'', असे वादग्रस्त विधान केले आहे.
(मुफ्ती सईद स्वत: विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रीमंडळात गृहमंत्री असतांना दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या त्यांच्या मुलीच्या सुटकेसाठी त्यांनी देशाच्या अटकेत असलेल्या मुसलमान दहशतवाद्यांना सोडून दिले होते. मुफ्ती महंमद सईद यांना रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे सरकारने त्यांना हद्दपार करणे ! - संपादक) ते म्हणाले, ``भारत सरकारने दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना मदत करावी. दहशतवादी कृत्ये करणार्‍यांच्या कुटुंबियांचा काय दोष आहे ? मी यासाठी पुढील महिन्यात पंतप्रधानांना भेटून तशी मागणी करणार आहे.'' (मुफ्ती महंमद सईद यांना देशाचा पैसा हा स्वत:च्या बापाचा पैसा वाटतो का ? - संपादक) काही दिवसांपूर्वी `काश्मीरमध्ये भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांचे चलन वापरण्यास मुभा असावी', असे विधान त्यांनी केले होते. (अशा देशद्रोही मुसलमानांना भारतात रहाण्याचा काय अधिकार ? - संपादक) मात्र मुफ्ती महमद यांचा हा प्रस्ताव सरकारने स्वीकारलेला नाही. काश्मीर हा भारताचा भाग असून तिथे परदेशी चलन कसे वापरता येईल, असे सरकारने म्हटले आहे. (असे सौम्य भाषेत सांगण्याऐवजी देशद्रोही वक्‍तव्य केल्याबद्दल सरकार जाब का विचारत नाही ? - संपादक)

No comments: