महंमद अश्फाकच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

महंमद अश्फाकच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती !

लाल किल्ल्यावरील दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण
आता महंमद अफजल प्रमाणे महंमद अश्फाक फाशीही दहशतवाद्यांचे पाठीराखे असलेले काँग्रेसचे सरकार लालफितीत गुंडाळून ठेवील ! - संपादक
नवी दिल्ली, ३ डिसेंबर (प्रे.ट्र.) - २००० साली राजधानीतील राष्ट्रीय मानबिंदू असलेल्या लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला करणार्‍या महंमद अश्फाक याच्या फाशीच्या शिक्षेवर आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली. (अट्टल दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा विनाविलंब देणे जनतेला अपेक्षित आहे. असे असतांना कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणणे जनतेला चक्रावणारे नव्हे का ? - संपादक) अश्फाकला दिल्ली महानगर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती व नंतर उच्च न्यायालयाने ती कायम ठेवली होती.

No comments: