काश्मीरमध्ये सभेला उपस्थित रहाण्यासाठी काँग्रेसकडून प्रतीव्यक्ती २०० रुपये !
अशी होते काँग्रेसच्या सभांना `भाडोत्रीं'ची गर्दी !
श्रीनगर, १६ मार्च (वृत्तसंस्था) - काश्मीरमधील जाहीर सभांना गर्दी व्हावी, यासाठी काँग्रेसकडून लोकांना प्रतीव्यक्ती २०० रुपये देऊन सभेला आणले जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
(जनतेचा विश्वास संपादन करून नाही, तर पैशांची लालूच दाखवून सभेसाठी गर्दी `निर्माण' करणारी काँग्रेस लोकशाहीद्रोही आहे. लोकहो, अशा कावेबाज काँग्रेसला आगामी निवडणुकीत सत्ताभ्रष्ट करा ! - संपादक) सभेला उपस्थित असलेल्या एका भाडोत्री युवकाने याविषयी प्रसारमाध्यमांसमोर खुलासा केल्यामुळे काँग्रेसचे बिंग फुटले आहे. जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसमध्ये नव्याने करण्यात आलेल्या बदलांनंतर येथे परवा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित रहाणार असल्याने शक्तीप्रदर्शन करणे आवश्यक ठरणार होते. त्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाडोत्री माणसे आणून गर्दी दाखवली. या प्रत्येक माणसाला सभा संपेपर्यंत उपस्थित रहाण्यासाठी दोनशे रुपये देण्यात आले होते. गर्दीत महिला व मुले यांचाही समावेश होता. याविषयी सांगणार्या युवकाने प्रतिक्रिया नोंदवतांना म्हटले, ``माझा काँग्रेसशी किंवा तिच्या विचारसरणीशी काहीच संबंध नाही. पैसे मिळतात म्हणून मी सभेला आलो आहे. केवळ मीच नाही, माझ्यासारखे हजारो लोक मैदानात त्यासाठीच आले आहेत.'' (अशी जनता व तिच्या मतांवर उभे रहाणारे सरकार देशाचे वाटोळे करतील, यात शंका नाही ! - संपादक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment