लोकहो, राष्ट्रध्वजाचा मान राखा !
स्वातंत्र्यदिन, गणराज्यदिन, वगैरे राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी सर्वत्र राष्ट्रध्वजाचा वापर मोकळेपणाने करण्यात येतो. असा वापर करीत असतांना राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या दृष्टीने खालील गोष्टींचे पालन करा !
राष्ट्रध्वज योग्य पद्धतीने उंच ठिकाणी फडकवा.
लहान मुलांना राष्ट्रध्वजाचा वापर खेळण्याप्रमाणे करू देऊ नका.
पताका म्हणून किंवा शोभेसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका.
राष्ट्रध्वज पायदळी तुडवला जाणार नाही, फाटणार नाही, याची दक्षता घ्या.
राष्ट्रध्वज जमिनीवर पडू देऊ नका.
कापडाचे तुकडे राष्ट्रध्वजाप्रमाणे दिसतील, अशा तर्हेने जोडू नका.
प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नका.
No comments:
Post a Comment