बांगलादेशी घुसखोरांमुळे भीषण समस्या - गृह व्यवहार समितीचा अहवाल

बांगलादेशी घुसखोरांमुळे भीषण समस्या - गृह व्यवहार समितीचा अहवाल

नवी दिल्ली, २० एप्रिल (प्रे.ट्र.) - बांगलादेशी घुसखोर ही देशासमोरची अत्यंत भीषण समस्या आहे, असे एका अहवालात गृह व्यवहार संसदीय समितीने म्हटले आहे. समितीने सादर केलेल्या ४६ पानी अहवालात बांगलादेशी घुसखोरांमुळे देशात उद्‌भवत असणार्‍या समस्या मांडल्या आहेत. श्रीमती सुषमा स्वराज या समितीच्या अध्यक्षा आहेत.
भारत-बांगलादेश सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात बनावट भारतीय चलनी नोटा वापरल्या जात आहेत. देशात पसरलेले बांगलादेशी घुसखोर अत्यंत सहजपणे भारतीय शिधावाटप पत्रिका, वाहन परवाना, मतदार परवाना व पॅन कार्ड उपलब्ध करून घेत आहेत. गुप्‍तचर खात्याच्या माहितीनुसार हे घुसखोर भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहेत. देशात काही बांगलादेशी दहशतवादी संघटना कार्यरत आहेत, अशी माहिती या अहवालात आहे. (हिंदूंनो, समस्येच्या स्वरूपाची रडकी पोपटपंची करणार्‍या नव्हे, तर त्या संकटावर मात करून असे संकट पुन्हा येणार नाही यासाठी काय उपाययोजना केली, हे देशाला सांगणार्‍या राज्यकर्त्यांची आज देशाला गरज आहे या समस्यांना जबाबदार नेभळट राज्यकर्त्यांना हटवण्यासाठी क्रांतीला सिद्ध व्हा ! - संपादक) भारत-बांगलादेश सीमारेषेवरील भौगोलीक स्थितीमुळे ही सीमारेषा घुसखोरांना ये-जा करण्यास सुलभ आहे. (या कारणांमुळे बांगलादेशला भारतीय घुसखोरांची समस्या भेडसावत नाही, कारण बांगलादेशात जगणे मुष्किल होईल व तेथून आपल्याला हुसकावून लावण्यात येईल हे भारतियांना माहीत आहे. याउलट बेकायदेशीरपणे भारतात घुसलो, तरी आपण पिढ्यान्पिढ्या तेथे ऐशारामात जगू शकतो, याची खात्री बांगलादेशी घुसखोरांना आहे. देशातील सर्वपक्षीय निष्क्रीय व मतांध राज्यकर्त्यांच्या अपयशाचे द्योतक असणारी ही स्थिती बदलण्यासाठी क्रांतीला पर्याय नाही ! - संपादक )

No comments: