भगवद्‍गीतेतील श्लोक यांचे महत्त्व जाणून आचरणात आणणारी अमेरिका

कुठे संस्कृत, मंत्र, उपनिषद व भगवद्‍गीतेतील श्लोक यांचे महत्त्व जाणून ते आचरणात आणणारी खरी विज्ञानवादी अमेरिका, तर कुठे वेद, उपनिषदे आदी हिंदूंचे असल्यामुळे त्यांचा तिरस्कार करणारे भारतातील निधर्मी राज्यकर्ते व खुजी विज्ञानवादी अंनिस !
20-04-2008


`अमेरिकेच्या काही भागांत संस्कृत भाषेबद्दल बरीच रुची निर्माण झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नेवाडा येथे दोन संस्कृत परिषदा घेण्यात आल्या. रेनो येथे नुकतेच ऋग्वेदातील गायत्री मंत्राचे पठण करण्यात आले. रेनो येथील बिशप मॅनोग यांनी `कॅथलिक शाळेतील मुलांवर ईश्‍वराची कृपा व्हावी', यासाठी त्या शाळेत तैत्तरीय उपनिषदातील स्तोत्रे व भगवद्‍गीतेतील श्लोक यांचे पठण करवले. ख्रिस्तीनववर्षाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेतील २६ युवकांनी दक्षिण कॅलिफोर्नियातील ईर्विन येथील हर्वार्ड सामाजिक केंद्रात एका कार्यक्रमात प्रेक्षकांसमोर संस्कृत भाषा शिकण्याचा निर्णय घेतला.'

No comments: