तालिबानी नेता मुल्ला महंमद ओमर हा आमचा आदर्श

तालिबानी नेता मुल्ला महंमद ओमर हा आमचा आदर्श - सफदर नागौरी

भारतात तालिबानी राजवट आणण्याचे सिमीचे स्वप्न !
फोंडा (गोवा), १३ एप्रिल (वृत्तसंस्था) - कुप्रसिद्ध दहशतवादी व तालिबानचा प्रमुख मुल्ला महंमद ओमर याच्यावर सिमी या संघटनेचा विश्‍वास असल्याचे दिसून आले आहे. ``भारत हे मुसलमान राष्ट्र बनवण्याचे सिमीचे ध्येय आहे. भारत हे केवळ इस्लामी राष्ट्र होऊन मुल्ला ओमर हे या राष्ट्राचे धर्मगुरु असतील'', असे सिमीचा भारतातील प्रमुख सफदर नागौरी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीच्या वेळी सांगितले.
(सध्या सिमी आणि इतर दहशतवादी संघटना भारतात आपली पाळेमुळे पसरवत आहेत. किती हिंदूंना व हिंदुत्ववादी संघटनांना याबद्दल चिंता वाटते ? या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हिंदूंना हाती शस्त्र घेण्याशिवाय पर्याय नाही - संपादक) सफदर नागौरी व सिमीच्या प्रमुख १२ नेत्यांना पकडणारे इंदूर पोलीस महासंचालक श्री. अनिलकुमार यांनी सदर माहिती `हिंदुस्तान टाईम्स' या वृत्तपत्राला दिली. पोलिसांना दिलेल्या माहितीत नागौरी म्हणाला, ``शरियतवर आधारित इस्लामी राज्य आम्ही भारतात आणणार आहोत. यासाठी ओमर याचे जिहादी तत्त्वज्ञान आम्ही आचरणात आणत आहोत.'' नागौरी याच्या घरातील संगणकावर तालिबानी तत्त्वज्ञानाविषयी ध्वनी तबकड्या व ध्वनिचित्र तबकड्या पोलिसांना सापडल्या आहेत.

No comments: