देशात १७५ दहशतवादी संघटना कार्यरत

देशात १७५ दहशतवादी संघटना कार्यरत

दहशतवाद्यांसाठी नंदनवन बनलेला भारत !
मुंबई, १४ एप्रिल (वृत्तसंस्था) - देशात १७५ दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचा गोपनीय अहवाल केंद्रीय गुप्‍तचर खात्याने देशातील सर्व राज्य सरकारांना पाठवला आहे. या संघटनांचे जाळे केवळ देशातच नाही, तर परदेशातही पसरले आहे, अशी माहिती या अहवालात आहे. अहवालानुसार सर्वात जास्त संघटना मणिपूरमध्ये व त्यानंतर आसाम व काश्मीर या राज्यांत आहेत.
(दहशतवादी संघटनांचा अहवाल प्राप्‍त झाला. आता काँग्रेसचे सरकार झोपायला मोकळे ! - संपादक) मणिपूरमध्ये ३९, आसाममध्ये ३६, काश्मीरमध्ये ३२, त्रिपुरामध्ये३०, मेघालय ४, नागालँड ३, मिझोराममध्ये २ आणि अरूणाचल प्रदेश १ अशा संघटना कार्यरत आहेत. सन १९८० च्या जवळपास पंजाबमध्ये दहशतवादाने थैमान घातले होते. आता तेथे १२ छोट्या संघटना कार्यरत आहेत. मुंबईत ८ ते १० छोटे दहशतवादी गट असून काश्मीरमधील ४ गट देशाबाहेरून सक्रिय आहेत. (दहशतवाद एवढ्या प्रचंड संख्येमध्ये देशात पसरला असतांना एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते अशा दहशतवाद्यांकडून मारले जाण्याच्याच लायकीचेआहेत. देशाला संपवू पहाणारा दहशतवाद व निष्क्रिय, नेभळट राज्यकर्ते यांच्या दुहेरी संकटातून देशाला वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या वैचारीक क्रांतीला पर्याय नाही ! - संपादक)या दहशतवादी संघटनांमध्ये `दुख्तरान-ए- मिल्लत' या मुसलमानी महिलांच्या दहशतवादी संघटनेचाही समावेश आहे. ही संघटना कुराणच्या आदेशांचे पालन करण्यासाठी अस्तित्वात आली आहे, असा तिचा दावा आहे. यातील अनेक संघटनांची मुख्य सूत्रे चीन व पाकिस्तान या देशांतून हलवली जात आहेत, असे या माहितीमध्ये नमूद केले आहे.

No comments: