देश कर्जबाजारी असतांना

देश कर्जबाजारी असतांना अशी सूचना करावी लागणारे लज्जास्पद काँग्रेसी राज्यकर्ते !
जनतेला महागाईच्या खाईत लोटून पंचतारांकित परिषदा व परदेश दौरे करणार्‍या काँग्रेसी राज्यकर्त्यांना सत्तेतून हटवा !
06-06-2008

-->
केंद्र सरकारच्या परिषदा पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊ नयेत - वित्त खात्याची सूचना
नवी दिल्ली, ६ जून (प्रे.ट्र.) - सरकारी कामकाजावर होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वेगवेगळया खात्यांतर्फे घेण्यात येणार्‍या परिषदा पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊ नयेत, अशी सूचना केंद्रीय वित्त खात्यातर्फे या खात्यांना देण्यात आली आहे. (याचबरोबर मंत्र्यांचे परदेश दौरे व इतर सरकारी कार्यक्रम यांवर होणार्‍या पैशांच्या उधळपट्टीलाही आळा घालावा ! - संपादक) जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे वित्त खात्यावरील भार वाढला असल्याने ही सूचना वित्त खात्याने केली आहे. वित्त खात्यातील खर्च विभागाच्या सचिव श्रीमती सुषमा नाथ यांनी सरकारी खर्च वाचवण्याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ``जादा काम केल्याबद्दल देण्यात येणारा भत्ता, देशातील व परदेशातील प्रवासासाठी देण्यात येणारा खर्च, सरकारी प्रकाशने, व्यावसायिक सेवा, जाहिराती आणि कार्यालयीन खर्च यांवर होणार्‍या खर्चात घट केल्यास सरकार ६ हजार कोटी रुपये वाचवू शकेल.'' (याचा अर्थ एवढी मोठी रक्कम सरकार विनाकारण खर्च करत आहे. जनतेचा घामाचा पैसा असा पाण्यासारखा खर्च करण्यास लाज न वाटणार्‍या समस्त शासकीय घटकांच्या वैयक्‍तिक तिजोर्‍यांतून हा खर्च वसूल करायला हवा ! - संपादक) यापूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सहकारी मंत्र्यांना पत्रे पाठवून `विमानप्रवासावर, विशेषकरून परदेशातील विमानप्रवासावर कमी खर्च करावा. अत्यंत आवश्यक असल्यासच विमानप्रवास करावा' अशी सूचना केली होती. (त्या सूचनेचे पालन झाले का, हे पंतप्रधानांनी पाहिले का ? नसेल तर असले कागदी घोडे नाचवायचेच कशाला ? - संपादक)

No comments: