काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मंत्रालयावर हल्ला
देशाच्या मानबिंदूवर हल्ले होत असतांनाही दहशतवादाचा नि:पात न करणारे षंढ राज्यकर्ते नकोत !
15-06-2008
-->
दहशतवादाचा नि:पात करण्यासाठी काँग्रेस सरकार आणखी कशाची वाट पहात आहे ?
श्रीनगर, १४ जून (प्रे.ट्र.) - दहशतवाद्यांनी आज मंत्रालयावर ग्रेनेडचा मारा केला. (गेली दोन दशके काँग्रेस सरकारने दहशतवाद निपटण्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळेच निर्ढावले दहशतवादी संसदेवर व मंत्रालयावर हल्ला करण्यास धजावतात. दहशतवादी राष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवत असतांना त्याच्या विरोधात काहीही न करणारे काँग्रेस सरकार क्रांती अपरिहार्य करते ! - संपादक) दहशतवाद्यांचे लक्ष्य चुकल्यामुळे ग्रेनेड `निलम चित्रपटगृहा'च्या समोर फुटले. या स्फोटामध्ये २ जण जखमी झाले असून त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील एका जवानाचा समावेश आहे. सूत्राशाही परिसरातून दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा मारा केल्याचा पोलिसांना संशय आहे. पूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या तळावर हल्ला केला होता; मात्र मंत्रालयावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (दहशतवाद्यांचे लक्ष्य चुकले, म्हणून मंत्रालयात असलेले राज्यकर्ते वाचले. या हल्ल्यातून बोध घेऊन काँग्रेसने दहशतवादाच्या विरोधात ठोस पावले उचलावीत. - संपादक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment