भारत सरकारच्या संगणकांवर संगणकीय हल्ले !
20-05-2008
चीन व पाकिस्तान या शेजारी शत्रूराष्ट्रांकडून भारताला नवा धोका !
नवी दिल्ली, १९ मे (प्रे.ट्र.) - चीन व पाकिस्तान या देशांतून भारत सरकारच्या संगणकांवर होणार्या संगणकीय हल्ल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतित झालेल्या संरक्षण यंत्रणेने देशातील संगणकीय यंत्रणा या हल्लेखोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना काढण्यास सुरुवात केली आहे.(दोन्ही शेजारी शत्रूराष्ट्रांना भारत कोणत्याही प्रकारे त्रास देत नसतांना ती राष्ट्रे मात्र भारताला छळण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या सातत्याने वापरत आहेत. अशा शत्रूंशी मैत्री करण्याचे दिवास्वप्न पहाणारे नव्हे, तर त्यांना कायमचा धडा शिकवणारे राज्यकर्ते हवेत ! - संपादक) चिनी व पाकिस्तानी संगणकीय हल्लेखोरांचा भारताला प्रामुख्याने धोका असून गेल्या काही महिन्यांतील अनेक हल्ले चीनमधून झाल्याचे निदर्शनास आले आहे. (भारत सरकार याबद्दल चीनच्या सरकारला जाब विचारणार का ? - संपादक) काही दिवसांपूर्वी परराष्ट्र व्यवहार खात्याच्या संगणकांवर झालेला हल्ला चीनमधूनच झाला होता. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये झालेल्या दंगलींनंतर गुजरात सरकारचे अधिकृत संकेतस्थळ `जीफोर्स' पाकिस्तानी हल्लेखोरांनी बिघडवले होते. (या हल्ल्याला भारत सरकारने कसे प्रत्युत्तर दिले, हे जनतेला समजायला हवे. भारताकडे पाकिस्तानपेक्षाही जास्त गुणवत्ता असलेले तज्ञ आहेत. त्यांचा उपयोग करून या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या सरकारची संगणकीय यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची धमक काँग्रेसप्रणीत भारत सरकारने का दाखवली नाही, याचे उत्तर त्याने जनतेला द्यावे ! - संपादक) या संकेतस्थळावरील सरकारी मजकूर काढून त्यांनी त्यांचा मजकूर प्रसारित केला होता. हल्लीच झालेल्या आणखी एका घटनेत युरोपातील एका संगणकीय हल्लेखोराने चीनमधील भारताच्या राजदूत श्रीमती निरूपमा राव यांचा संगणकीय पत्ता वापरला होता. (सर्वपक्षीय भारतीय राज्यकर्त्यांचा नेभळटपणा जगजाहीर झाल्यामुळे कुणीही उठतो, भारताशी संबंधित कसलीही आगळिक करतो ! - संपादक) `भारताची संगणक सुरक्षायंत्रणा किती कुचकामी आहे, हे दाखवण्यासाठी मी असे केले', असे त्याने सांगितले होते. (निर्ढावलेल्या काँग्रेसप्रणीत राज्यकर्त्यांना या घटनेची लाज वाटण्याची शक्यताच नाही ! - संपादक) अशा हल्ल्यांमुळे देशाची महत्त्वाची माहिती चोरीस तर जाऊ शकतेच; पण यंत्रणाही कोलमडून पडू शकते, असे सूत्रांनी सांगितले. (काँग्रेसप्रणीत भारतीय राज्यकर्त्यांना देशाच्या सीमांपासून संगणकांपर्यंत काहीही राखता येत नाही. असे राज्यकर्ते राज्य करण्याच्या लायकीचे आहेत का ? - संपादक) हा धोका टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा आशयाची पत्रे राष्ट्राच्या सेर्ट-३ या संगणक सुरक्षा खात्याने सर्व शासकीय यंत्रणांना पाठवली आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment