मडगाव येथे तलवारी असलेला ट्रक जप्‍त_ सर्वत्र खळबळ

मुसलमान वस्ती असलेल्या मोतीडोंगर, मडगाव येथे तलवारी असलेला ट्रक जप्‍त : सर्वत्र खळबळ
04-07-2008

मडगाव, ४ जुलै (वार्ता.) - येथील शहर पोलिसांनी आज मुसलमानांचे प्राबल्य असलेल्या मोतीडोंगर या भागात रस्त्यावर उभा केलेला जीए ०१ डब्ल्यू ५७८५ हा सुमारे ५० तलवारी व चॉपर्स असलेला ट्रक जप्‍त केला; परंतु पोलिसांनी केवळ १७ तलवारी मिळाल्याचे सांगितले.
(`दहशतवादी एका समाजाचेच नसतात, सर्व मुसलमान दहशतवादी नसतात', असे म्हणणार्‍यांना याबाबत काय म्हणायचे आहे ? - संपादक) दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक श्री. शेखर प्रभुदेसाई म्हणाले की, अज्ञातांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वरील कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी `आर्म्स एक्ट' अंतर्गत अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. सदर ट्रक कोणाच्या मालकीचा आहे, या प्रश्‍नाला उत्तर देतांना पोलीस अधीक्षक श्री. प्रभुदेसाई यांनी यासंबंधी तपास चालू असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे मुसलमानांनी हिंदु युवतीची छेड काढणे व बजरंग दलाचे श्री. महंतेश रागी यांच्या दुकानाची मोडतोड केल्याच्या प्रकरणी मडगाव येथे २७ जून रोजी जातीय दंगल उसळली होती. या घटनेला आठवड्याचा अवधी उलटण्यापूर्वीच मोतीडोंगर येथे तलवारी जप्‍त करण्यात आल्याने या घटनेला आता विशेष महत्त्व प्राप्‍त झाले आहे. मोतीडोंगर या मुसलमानांचे प्राबल्य असलेल्या भागात राज्यकर्त्यांची नेहमी मेहरनजर असल्याने पोलीस या घटनेचा कोणत्या दृष्टीने तपास करणार, याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

No comments: