सावंतवाडी (तालुका बारामती) येथे शिरसाई देवीच्या मूर्तीवर विष्ठा

सावंतवाडी (तालुका बारामती) येथे शिरसाई देवीच्या मूर्तीवर विष्ठा टाकून मूर्तीची विटंबना !
04-09-2009

सावंतवाडी (तालुका बारामती), ४ सप्टेंबर - काल पहाटेच्या वेळी हिंदुद्वेष्ट्यांनी येथील शिरसाई येथील शिरसाई देवीच्या मूर्तीला प्लास्टीकच्या पिशवीच्या साह्याने विष्ठा लावून ती पिशवी मूर्तीच्या चेहर्‍याला चिकटवून मूर्तीची घोर विटंबना केली !
(धर्माभिमान्यांनो, काँग्रेसच्या राज्यात तुमची मंदिरे सुरक्षित नाहीत, हे लक्षात घ्या ! हे कृत्य करणार्‍या हिंदुद्वेष्ट्याचा शोध घेऊन त्याला मोठी शिक्षा होईल, असा प्रयत्‍न करा ! - संपादक) हा प्रकार गावातील श्री. अनिल सावंत यांच्या सकाळी देवीचे दर्शन घ्यायला गेल्यावर लक्षात आला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना कळवले. श्रद्धेय देवतेची विटंबना पाहून येथील हिंदूंचा उद्रेक झाला. संतप्‍त झालेल्या हिंदूंचा जमाव मंदिराभोवती एकत्र झाल्याने तिथे तणाव निर्माण झाला. या प्रकरणी मंदिराच्या विश्‍वस्तांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मोठा फौजफाटा आणून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्‍न केला. तसेच मूर्तीची विटंबना करणार्‍या गुन्हेगाराला तात्काळ अटक केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी सर्व मंदिर आणि मूर्ती धुवून काढली. मंदिराची मूर्तीची शुद्धी करून, अभिषेक घालून मूर्तीची पूजा आणि आरती करण्यात आली. सावंतवाडी गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून धर्मशिक्षणवर्ग सुरू आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती होत आहे. त्यामुळे धर्मद्रोह्यांना पोटशूळ ऊठून त्यातून त्यांनी केलेली घृणास्पद कृती असावी, असा काही लोकांचा समज आहे.
बरेच हिंदू ``पोलिसांमध्ये तक्रार द्यायला नको. त्यामुळे गावाची सर्वत्र बदनामी होईल'', असे म्हणत होते. (हिंदूंनो, तुमच्या देवतांची आणि मंदिरांची अशी विटंबना सर्वत्र होण्याचे प्रमाण वाढत असतांना त्याविरोधात एकत्र येऊन आवाज उठवला नाहीत, तर एक दिवस तुमचे देव आणि मंदिरे यांपैकी काहीच उरणार नाही, हे लक्षात घ्या ! - संपादक)पोलीसही ``ही बातमी गावापुरती मर्यादित ठेवा. बाहेर सांगू नका त्यामुळे लोकांमध्ये तणाव निर्माण होईल'', असे म्हणत होते. (वारंवार तणाव निर्माण होईल म्हणून घाबरणारे कर्तव्यचुकार पोलीस मूर्तीविरोधकांना शिक्षा करून अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्‍न का करत नाहीत ? निधर्मी काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झालेल्या पोलिसांनो, देव आणि धर्म यांचे रक्षण केलेत, तर तो तुमचे रक्षण करेल, हे लक्षात ठेवा ! - संपादक)

No comments: