देशातील ४० सहस्र चौरस कि.मी. क्षेत्रावर नक्षलवाद्यांचा ताबा

देशातील ४० सहस्र चौरस कि.मी. क्षेत्रावर नक्षलवाद्यांचा ताबा
17-09-2009

-->
देशावर शासन कोणाचे ? गांधीवादी (षंढवादी) काँग्रेसचे कि नक्षलवाद्यांचे ?२० राज्ये आणि २३३ जिल्हे प्रभावित
एका बाजूने चीनने सीमेवर घुसखोरीच्या कारवाया करून भारताला जेरीस आणले असतांना नक्षलवाद्यांनी देशांतर्गत कारवाया करून जनतेला वेठीस धरले आहे. नेपाळमध्ये जसे नक्षलवाद्यांनी चीनचे साहाय्य घेऊन तेथील सत्ता हस्तगत केली, तसेच उद्या भारतातील नक्षलवाद्यांनी शेजारील चीनचे साहाय्य घेऊन गांधीवादी (षंढवादी) काँग्रेस शासन उलथवून देश ताब्यात घेतल्यास नवल ते काय ?
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर - देशातील ४० सहस्र किलोमीटर भूभाग नक्षलवाद्यांच्या ताब्यात गेला आहे, अशी माहिती काल केंद्रीय गृह खात्याने संसदीय स्थायी समितीपुढे सादर केली आहे. (स्वातंत्र्यानंतर पाकने काश्मीरचा सहस्रावधी चौरस कि.मी.चा भाग गिळंकृत केला, १९६२च्या युद्धात चीनने सहस्रावधी चौरस कि.मी. भूभाग गिळंकृत केला. गेल्या दोन दशकांमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांमुळे काश्मीरमधून हिंदूंना परागंदा व्हावे लागले, कोट्यवधी मुसलमान बांगलादेशी घुसखोरांनी देशाच्या जागेचा ताबा घेतला आहे आणि आता नक्षलवाद्यांकडून ४० सहस्र चौरस कि.मी.च्या भूभागाचा ताबा घेतल्याचे उघड झाले. या परिस्थितीला केवळ षंढ काँग्रेस शासनच उत्तरदायी आहे. देशाला संकटात टाकणार्‍या अशा देशद्रोही काँग्रेस शासनाला राष्ट्र आणि धर्मप्रेमी राज्यकर्त्यांच्या राज्यात कठोर शिक्षा देण्यात येईल ! - संपादक) काल भाजप नेते श्री. व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीपुढे गृह खात्याने नक्षलवाद्यांच्या कारवायांची माहिती दिली. नक्षलवाद्यांच्या विविध गटांनी या क्षेत्रावर ताबा घेतला आहे. येथेच नक्षलवाद्यांची सर्वाधिक हालचाल दिसून येते. येथे शासनाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव जी.के. पिल्लई यांनी या वेळी दिली. अलीकडेच गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी २० राज्ये आणि दोन सहस्र पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत माओवाद्यांचा प्रभाव जाणवत असल्याचे सांगितले होते. २३३ जिल्ह्यांना या हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी मान्य केले होते. (हे निलाजरेपणे मान्य करण्यापेक्षा नक्षलवाद निपटून काढण्याचा पराक्रम दाखवा ! - संपादक)

No comments: