मुसलमानांकडून हिंदूंना घरात घुसून जबर मारहाण : पोलीस घाबरून पळाले !
सणासुदीच्या दिवसांत मार खाणार्या हिंदूंनो, हे दुष्टचक्र थांबवा व लढवय्ये बनून प्रतिकार करा !
`होळी' पेटवण्याच्या कारणावरून अंबाजोगाई येथे दंगल
अंबाजोगाई (जिल्हा बीड), २३ मार्च (वार्ता.) - येथील संत रविदास चौकात परंपरागतरीत्या पेटवण्यात येणार्या होळीला मज्जाव करत धर्मांध मुसलमानांनी अंबाजोगाई येथे दंगल घडवली. या दंगलीत १७ हिंदू जखमी झाले असून त्यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या दंगलीत मुसलमानांनी हिंदूंना अक्षरश: घरात घुसून जबर मारहाण केली आहे. मुसलमानांकडून हिंदूंवर अत्याचार होत असतांना काही पोलिसांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला, तर काही पोलीस घाबरून पोलीस ठाण्यातून बाहेर पडले नाहीत. अंबाजोगाई शहरातील `संत रविदास चौकातील' मोची गल्ली येथे अनेक वर्षांपासून परंपरेनुसार होळीचा सण साजरा करण्यात येतो. काल मुस्लिमांचा ईद हा सण होता. या निमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने मुसलमानांनी संत रविदास चौकात होळी पेटवण्याच्या जागेवरच मुद्दाम कमानी व मंडप टाकून सरबत वाटपाचा कार्यक्रम ठेवला. (हिंदूंनो, मुसलमानांची अशी मुजोरी किती दिवस खपवून घेणार ? - संपादक) त्यास हिंदूंनी आक्षेप घेतला. त्यानंतर हिंदूंनी पोलीस ठाण्यातील फौजदार श्री. मुद्दीराज यांच्याकडे अर्ज सादर केला.
त्यानंतर मुस्लिम समाजातील नेत्यांनी आमचा कार्यक्रम दुपारी २ वाजता संपणार आहे. त्यानंतर `होळी पेटवा' असा समेट केला. त्याप्रमाणे आज सायंकाळी ४.३० वाजता हिंदु तरुण होळी पेटवण्याच्या जागेवर लाकडे, गोवर्या व होळीचे साहित्य आणून टाकत होते. त्या वेळी आक्रमक झालेल्या धर्मांध दीड ते दोन हजार मुसलमानांनी ``इथे होळी पेटवायची नाही. तुम्ही मूठभर आहात. आमचे काय वाकडे करणार ?'', असे म्हणत हिंदूंच्या अंगावर प्रचंड दगड व विटा यांचा मारा सुरू केला.
रक्ताची होळी खेळण्याच्या उद्देशाने होळीच्या लाकडांनी हिंदु तरुणांवर चाल करून लोखंडी गज व शस्त्रे यांनी त्यांना मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी हिंदु तरुणांनी घरांचा आसरा घेतला. त्या वेळी मुस्लिम तरुणांनी हिंदूंच्या घरांवर चाल करून घरांची दारे व खिडक्या मोडून घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावर न थांबता घरातील महिलांवर हल्ला चढवून पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ही भयंकर घटना घडत असतांना घटनास्थळावरील पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान भीतीने पळून गेले, तर ठाण्यातील पोलीस बाहेर येण्यास घाबरत होते. (असे पोलीस स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, तर जनतेचे रक्षण काय करणार ? हिंदूंनो, तुमचे कोणी रक्षण करणार नसल्याने वेळीच संघटित व्हा, अन्यथा तुमचा नाश अटळ आहे ! - संपादक) अंबाजोगाई ठाण्याचे निष्क्रीय पोलीस फौजदार श्री. बी. मुद्दीराज यांनी दंगल आटोक्यात आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. सर्वप्रथम अंबाजोगाई येथील पत्रकारांनी पोलीस ठाण्यात व घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती जाणून घेऊन मुद्दीराजांना धारेवर धरले. तेव्हा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या २०० तरुणांना अटक केली. (दंगल मुजोर मुसलमानांनी घडवली. मग हिंदु तरुणांना अटक का ? - संपादक)जखमींना उपचारार्थ स्वाराती रुग्णालयात दाखल केले आहे. घटना घडल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, श्री. सुधाकर सुरेडकर यांनी जमावाला शांत रहाण्याचे आवाहन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment