तीन महिन्यांत चीनचे १२ वेळा भारताच्या भूभागावर अतिक्रमण
चीनकडून होणार्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष म्हणजे नेहरूंच्या षंढ धोरणांची काँग्रेसकडून जोपासना !
वारंवार अतिक्रमणे होऊनही बघ्याची भूमिका घेणारे गांधीवादी (कि षंढवादी) काँग्रेसचे राज्यकर्ते !
नवी दिल्ली, ८ एप्रिल (वृत्तसंस्था) - भारताच्या लडाखमधील `पँगोग त्सो लेक' या भागात जानेवारी महिन्यापासून चीनने १२ वेळा अतिक्रमण केले. लडाखच्या डेमचोक आणि ट्रीग हाईटस् या भागांतही चीनच्या `पीपल्स लिबरेशन आर्मी'च्या कारवाया वाढल्या आहेत. या भागात चिनी लष्कराकडून अतिक्रमण होत आहे.
(चीनच्या दडपशाहीला नि:शस्त्र तिबेटी नागरिक जगभर कडवा विरोध करत आहेत. भारतातीला षंढ राजकारण्यांनी भरलेले सरकार चीनच्या कारवायांपुढे नांगी टाकण्यापलीकडे काहीच करत नाहीत. त्यांना हाकलून देणे हाच देश सुरक्षित ठेवण्यासाठीचा पर्याय होय ! - संपादक) २३ मार्च रोजी चीनच्या लष्करातील जवानांनी एका वाहनातून सीमारेषा ओलांडून भारताच्या ताब्यातील पँगोग त्सो भागात प्रवेश केला व काही वेळ थांबून ते परत गेले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. (या वेळी भारतीय लष्कराने त्यांना जाब का विचारला नाही ? - संपादक)
या तलावाच्या दक्षिण किनार्यापर्यंत चीनने रेल्वेमार्ग बांधून काढला आहे. भारताच्या लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या सर्व भागांत चीनचे अतिक्रमण चालूच आहे. २००७ या वर्षात चिनी सैन्याने एकूण १४० वेळा सीमारेषेवर अतिक्रमण केले आहे. (एवढ्या वेळा चीनने अतिक्रमण केले हा प्रश्न भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर का मांडला नाही ? - संपादक)
याशिवाय चीनने सीमारेषेवर लष्करासाठी सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. तिबेट प्रश्नाच्या बाबतीत भारतावर दबाव आणणे तसेच सीमारेषेवरील भागावर ताबा मिळवणे हा चीनचा उद्देश असल्याचे काही निरीक्षकांचे म्हणणे आहे; मात्र भारताचे परराष्ट्रमंत्री श्री. प्रणव मुखर्जी व संरक्षणमंत्री ए. के. अँथनी यांनी ``या घटना सीमारेषेच्या बाबत प्रत्येक देशाच्या असलेल्या समजुतीमुळे निर्माण झाल्या आहेत'', असे म्हटले आहे. सीमारेषेवर शांतता नांदत असून भीती बाळगण्याचे कारण नाही, असे भारत सरकारतर्फे सांगितले जात आहे. (`हिंदी-चिनी भाई भाई', अशा घोषणा देऊन भारतावर युद्ध लादणार्या चीनचा इतिहास राज्यकर्ते विसरले का ? - संपादक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment