म्हणे चित्रपटात धूम्रपान करणे हे कलाकाराचे सृजनशील स्वातंत्र्य

म्हणे चित्रपटात धूम्रपान करणे हे कलाकाराचे सृजनशील स्वातंत्र्य !

शाहरूख खान यांचे समाजविघातक प्रतिपादन !
मुंबई, २८ जानेवारी (प्रे.ट्र.) - केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांच्या `चित्रपट अभिनेत्यांनी चित्रपटात धूम्रपान टाळावे', या विधानावर आक्षेप घेत प्रख्यात चित्रपट अभिनेते शाहरूख खान यांनी `कलाकारांनी चित्रपटात धूम्रपान करणे, हे सृजनशील स्वातंत्र्य आहे. त्यावर बंदी लादण्याची मागणी होऊ नये', असे प्रतिपादन केले.
(समाजाच्या स्वास्थ्याचा विचार न करता कलाकाराच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडून देशाप्रती काहीएक कर्तव्य नसल्याची भाषा करणार्‍या समाजद्रोही शाहरूख खान यांना हद्दपार करा ! - संपादक)शाहरूख खान व श्री. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्यांनी सार्वजनिक ठिकाणी व चित्रपटात धूम्रपान करणे टाळावे अन्यथा त्यांचा चाहता असलेला तरुणवर्ग त्यांचे अनुकरण करतो, असे प्रतिपादन श्री. रामदास यांनी काल केले होते. (यथायोग्य व परखड भूमिका मांडल्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यावर प्रतिक्रिया देतांना शाहरूख खान बोलत होते.सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास प्रतिबंध असतांना २००४ साली ४२ वर्षीय शाहरूख खान यांनी त्या नियमाचे उल्लंघन केले होते व त्यासंदर्भात ते यापूर्वीच टीकेस पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संघटनेने शाहरूख खान यांना क्रिकेट मैदानाच्या प्रेक्षकगृहात व प्रसारमाध्यमांसमोर बसून धूम्रपान केल्याच्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. (अशा व्यसनी अभिनेत्यांचा उदोउदो करणार्‍या त्यांच्या चाहत्यांचा धिक्कार ! - संपादक)

No comments: