देशात ३ कोटी ७० लाख बोगस शिधापत्रिका - केंद्रीय कृषीमंत्री
करदात्यांना महागाईच्या खाईत लोटणार्या; पण घुसखोरांना बोगस शिधापत्रिका वाटणार्या काँग्रेसला हटवा !
बांगलादेशींच्या स्वैराचाराला खतपाणी घालणार्या काँग्रेसचे पाप !
नवी दिल्ली, २१ एप्रिल, (प्रे.ट्र.) - देशामध्ये ३ कोटी ७० लाख बोगस शिधापत्रिकांचे वाटप झाले आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार यांनी आज लोकसभेत बोलतांना सांगितले.
(हे जनतेला अगोदरच माहीत आहे. बांगलादेशमधील मुसलमानांना पोसायची जबाबदारी घेतल्यावर आणखी काय होणार आहे ? - संपादक) देशातील राज्यशासनांनी १० कोटी २८ लाख दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शिधापत्रिकांचे वाटप केले आहे; मात्र सरकारी आकडेवारीनुसार देशात ६ कोटी ५२ लाख कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. वाटप करण्यात आलेली ३ कोटी ७० लाख शिधापत्रके बोगस असून राज्य सरकारांना या बाबतीत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे श्री. पवार यांनी पुढे सांगितले. (३ कोटी ७० लाख बोगस शिधापत्रिका वाटल्या जाईपर्यंत झोपलेले व आता सूचना व कारवाई करण्याचे निर्देश देणारे निद्रिस्त कृषीमंत्री पवार ! - संपादक) बोगस शिधापत्रिका बाळगणार्या व्यक्तीवर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले असून अशा शिधापत्रिकांचे वाटप करणार्या सरकारी कर्मचार्यांना यासाठी दोषी मानण्यात येणार आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment