देशद्रोही दाऊद टोळी `तोयबा'मध्ये विलीन

देशद्रोही दाऊद टोळी `तोयबा'मध्ये विलीन !
एकेकाळी गल्लीबोळांत गुंडगिरी करणार्‍या दाऊदने भारताच्या नाकीनव आणणे, हा सर्वपक्षियांचा नाकर्तेपणा !
30-03-2008

मुंबई, ३० मार्च (वृत्तसंस्था) - १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या बाँबस्फोटांचा प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम याची टोळी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत विलीन झाली आहे.
(मुंबईमध्ये बाँबस्फोट होऊन पंधरा वर्षे लोटली, तरी आतापर्यंत केंद्रात सत्तेवर असलेल्या एकाही पक्षाने दाऊद याला पाकिस्तानात जाऊन पकडण्याची हिंमत दाखवली नाही. त्याची फलनिष्पत्ती आता दिसत आहे. अशा जनताद्रोही व देशद्रोही राज्यकर्त्यांना जनतेने निवडणुकीच्या वेळी लक्षात ठेवावे. - संपादक) भारतातील अनेक देशविघातक कारवायांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा हात आहे. पुढील काळात भारतात देशविघातक कारवाया घडवून आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्‍तचर संघटना आय.एस्.आय.ने दाऊद इब्राहिम याच्या टोळीला लष्कर-ए-तोयबामध्ये विलीन होण्यास सांगितले, अशी माहिती हाती लागली आहे. दाऊद टोळीचा तोयबात झालेल्या विलिनीकरणाचा सर्वाधिक धोका हिंदूंना ! पूर्वी दाऊद याच्या टोळीमध्ये हिंदु धर्मीय गुन्हेगारही सदस्य होते. त्यामध्ये राज शेट्टी व छोटा राजन यांसारख्या हिंदु गुंडांचा समावेश होता. त्या वेळी या टोळीचे ध्येय पैसा कमवणे, हा होता. त्यामध्ये धर्माला स्थान नव्हते; मात्र लष्कर-ए-तोयबात विलिनीकरण झाल्यानंतर दाऊद टोळी धर्मांध बनणार आहे. लष्कर-ए-तोयबा ही जिहादी संघटना असून भारतातील हिंदूंचा नि:पात करणे, हे त्याचे ध्येय आहे. त्यामुळे दाऊद याच्या टोळीतील सदस्य आता सशस्त्र जिहादी दहशतवादी बनणार आहेत.

No comments: