न्यूजर्सी (अमेरिका) येथे द लव्ह गुरु' चित्रपटाच्या विरोधात भित्तीपत्रके

न्यूजर्सी (अमेरिका) येथे १० ठिकाणी धर्मद्रोही `द लव्ह गुरु' चित्रपटाच्या विरोधात भित्तीपत्रके !
06-06-2008

-->
न्यू जर्सी (अमेरिका) - हिंदु जनजागृती समितीचे येथील कार्यकर्ते श्री. नीलेश, श्री. साहस व कु. पल्लवी यांनी अवघ्या दोन दिवसांत शहरातील १० ठिकाणी `धर्मद्रोही लव्ह गुरु' चित्रपटाला विरोध करा', अशा आशयाची भित्तीपत्रके लावली. ५ किराण्याची दुकाने, ३ भारतीय भोजनालये, १ मंदिर, तसेच एका वाढदिवस समारंभात ही भित्तीपत्रके लावण्यात आली.

सर्व ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अनेक किराण्याच्या दुकानदाराने इतिहासद्रोही `जोधा-अकबर' चित्रपटालाही विरोध करा, अशी प्रतिक्रिया दिली, तर एका दुकानदाराने दुकानाच्या दोन्ही बाजूस ही भित्तीपत्रके लावून घेतली. मंदिरात भित्तीपत्रक लावत असतांना दोन भारतीय महिलांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. मंदिरात हिंदु स्वयंसेवक संघाशी निगडित एक दांपत्य भेटले, त्यांनी त्यांच्या साप्‍ताहिक बैठकीत हा विषय मांडण्यासाठी काही भित्तीपत्रकांची मागणी केली.

No comments: