नवरात्रीत एड्सचे रुग्ण वाढण्याचा धोका

नवरात्रीत एड्सचे रुग्ण वाढण्याचा धोका !
17-09-2009

-->
धर्मशिक्षणाच्या अभावाचे दुष्परिणाम !
हिंदूंचे सण आणि उत्सव हे मौजमजा करण्यासाठी नसून धार्मिकता जोपासून ईश्‍वराची उपासना करण्यासाठी असतात,हे धर्माचरणाअभावी विसरलेल्या हिंदूंनो, उत्सवाचे खरे महत्त्व जाणा !
मुंबई, १७ सप्टेंबर - नवरात्रीत एड्सचे रुग्ण वाढण्याचा धोका असल्याची चेतावणी आधुनिक वैद्यांनी दिली आहे. (इतके दिवस नवरात्रीत गर्भपाताचे प्रमाण वाढते, असे निरीक्षण करण्यात येत होते. आता त्याही पुढे जाऊन एड्सचे रुग्ण वाढण्याचा निर्माण झालेला धोक समाजाचे धर्मशिक्षणाच्या अभावी झालेले अध:पतनच दर्शवतो ! -संपादक) निरोध किंवा गर्भनिरोधक गोळया या एड्सपासून संरक्षण देत नाहीत, असे आधुनिक वैद्यांनी स्पष्ट केले आहे. एड्स क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या अलका देशपांडे यांनी या सूत्राबाबत असे स्पष्ट केले आहे की, `तरीही तरुण-तरुणींकडून काही चूक झालीच तर त्यांनी एड्सच्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे' (युवक-युवतींना स्वैराचारापासून रोखण्याचा उपदेश करण्याऐवजी चंगळवादाला उघड उघड प्रोत्साहन देणार्‍या अलका देशपांडे यांचा निषेध करावा तेवढा थोडाच ! - संपादक)

No comments: