भारताचा गौरवशाली वैज्ञानिक इतिहास

भारताचा गौरवशाली वैज्ञानिक इतिहास

आजचे हिंदू (भारतीय) आपले स्वत्व हरवत चालले आहेत. हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्‍त करावयाचे असेल, तर त्यांनी त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करावे. पाश्चात्त्य संशोधकांना लाजवील, असा भारताचा गौरवशाली वैज्ञानिक इतिहास आहे. भारतीय ऋषींच्या बुद्धीची गरुडभरारी पाहून आजच्या शास्त्रज्ञांनाही अचंबित व्हायला होते. समस्त भारतियांना अभिमानास्पद असलेल्या या ठेव्यातील काही रत्‍ने आपल्यापुढे सादर करीत आहोत. यापासून स्फूर्ती घेऊन भारतियांनी वाटचाल केली, तरीही या लेखमालेचे सार्थक झाले, असे म्हणता येईल.

भारताचा गौरवशाली वैज्ञानिक भविष्यकाळअणूविज्ञान - वस्तूच्या अणूस्पंदनांमध्ये बदल घडवून एका वस्तूचे दुसर्‍या वस्तूमध्ये रूपांतर करता येणे शक्य होणार असणे प्रत्येक वस्तूला विशिष्ट प्रकारची अणुस्पंदने असतात. या अणुस्पंदनांमध्ये बदल घडवला असता एका वस्तूचे दुसर्‍या वस्तूमध्ये रूपांतर करता येते, उदा. समजा सोन्याची अणुस्पंदने ९९ आहेत व कोळशाची अणुस्पंदने ९८ आहेत, तर भावी काळामध्ये कोळशाच्या अणुस्पंदनांमध्ये वाढ करून कोळशाचे सोने बनवता येते, हे विज्ञानाने सिद्ध होईल. तसेच पारा व इतर वनस्पती यांचा वापर केल्याने धातूपासून सोने बनवता येते हेही विज्ञानाने सिद्ध होईल.२०७० नंतर मानवाच्या लक्षात येईल की, साधू जे चमत्कार करतात ते अध्यात्म नसून विज्ञान आहे (उलट विज्ञान असे काही नसून सर्व अध्यात्मच आहे !) व या विज्ञानाने हवी ती वस्तू एका मिनिटात तयार करता येते. याच विज्ञानाद्वारे गोरक्षनाथांनी पिंगलाराणीच्या मृतदेहाच्या राखेतून हजारो पिंगला निर्माण केल्या होत्या. - श्रीस्वामी दत्तावधूत (संदर्भ : अगम्य वाणी, पृ. ३४) (संदर्भ : सनातनचे आगामी प्रकाशन)

No comments: