के.ई.एम्. रुग्णालयाला मोगल राजा बहादूरशहा जफर यांचे नाव देण्याची मागणी
रुग्णालयाला बादशहाचे नाव देण्याची मागणी म्हणजे सार्वजनिक ठिकाणांचे इस्लामीकरण करण्याची मुसलमानांची हुशारी !
मुंबई, २४ जानेवारी (वार्ता.) - परळ येथील महापालिकेच्या के.ई.एम्. रुग्णालयाला भारतातील शेवटचे मोगल राजे बहादूरशहा जफर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाच्या गटनेत्या व नगरसेविका आस्मा शेख यांनी पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
(हिंदुद्वेष्टा समाजवादी पक्ष ! इंग्रजी नाव रद्द करण्यासाठी मुसलमान राजाचे नाव देण्याची काय आवश्यकता ? भारतासाठी इंग्रज व मुसलमान दोघेही आक्रमणकर्तेच आहेत. जफर यांनी असे कोणते कर्तृत्व गाजवले आहे की त्यांचे नाव रुग्णालयाला द्यावे ? हिंदूंनी याविरोधात आवाज उठवावा. - संपादक) स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही काही वास्तूंना ब्रिटिश सरकारने ठेवलेली नावे आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी त्यांचे प्राण गमावले, अशा क्रांतीकारकांची आठवण रहावी, म्हणून त्यांची नावे या वास्तूंना देण्यात यावीत. १८५७ च्या लढ्यात त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोठा लढा दिला, असे शेख यांनी म्हटले आहे. (के.इ.एम्. रुग्णालयाला बादशहाचे नाव देण्याची मागणी मुसलमान करतात, मग उठसुठ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे काँग्रेस सरकार या रुग्णालयाला छत्रपतींचे नाव का देत नाही ?- संपादक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment