असा होता क्रूरकर्मा औरंगजेब

असा होता क्रूरकर्मा औरंगजेब !


दोन दिवसांपूर्वी चेन्नई येथे `फॅक्ट'निर्मित `असा होता औरंगजेब' या औरंगजेबाची कुकृत्ये उघडकीस आणणार्‍या चित्रप्रदर्शनावर धर्मांध मुसलमानांनी आक्षेप घेतला व हिंदुद्वेषी पोलिसांनी त्या चित्रप्रदर्शनाला टाळे लावले. खरेतर हिंंदूंनी ६० वर्षे सोसलेले औरंगजेबी अत्याचार पहाण्यात व वाचण्यात कोणतीही अडचण असू नये. वडील शहाजहान यांना कारावासात टाकून, दारा व मुराद या भावांना ठार मारून आणि तिसरा भाऊ शुजा याला परागंदा करून १६५८ मध्ये औरंगजेब सत्तेवर आला. त्यानंतर साठ वर्षांच्या कालावधीत सत्तेवर असलेल्या या क्रूरकर्म्याचा इतिहास माहीत करून न घेणे म्हणजे आत्मघातच ठरेल.

`काफिरांच्या सर्व पाठशाळा व देवालये' पाडण्याची आज्ञा !९ एप्रिल १६६९ रोजी औरंगजेबाने एक फतवा काढून काफिरांच्या (हिंदूंच्या) सर्व पाठशाळा व देवालये पाडून टाकण्यात यावीत व काफिरांच्या धार्मिक चालीरीती आणि शिकवण यांवर दडपशाहीचा वरवंटा फिरवण्यात यावा, असा हुकूम हिंदुस्थानभर जारी केला. त्याची आसुरी दृष्टी हिंदुस्थानात सर्व हिंदूंना अतिशय पूज्य असलेल्या मोठमोठ्या देवालयांवर पडू लागली. सोमनाथाचे दुसरे देवालय, काशीचे विख्यात विश्वेश्वराचे मंदिर आणि मथुरा येथील केशवराजाचे मंदिर ही हिंदूंची श्रद्धास्थाने औरंगजेबाला नजरेसमोर नकोशी वाटू लागली.औरंगजेबी वटहुकमाचे त्वरित पालन होऊ लागले आणि सार्‍या देशातील मंदिरे फोडली जाऊ लागली. शके १५९१ च्या भाद्रपदात, म्हणजे इ.स. १६६९ च्या ऑगस्ट महिन्यात बनारस येथील काशी विश्वेश्वराचे मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. पाठोपाठ तेथील गोपीनाथाचे मंदिरही धुळीस मिळाले. जंगमवाडी भागातील शिवमंदिरही नष्ट करण्याचा प्रयत्‍न झाला.
(`शककर्ते शिवराय', लेखक : श्री. विजयराव देशमुख, नागपूर)स्वत:ला `शुद्ध इस्लाम धर्माचा पाठीराखा' म्हणवणार्‍यांची कृती नेहमीच अशी का असते, याचे उत्तर एखादा `सर्वधर्मसमभावी' देईल का ? औरंगजेबाने भ्रष्ट केलेली मंदिरे आजही हिंदूंचा नामर्दपणा सर्व जगाला दाखवत आहेत !

No comments: