...तर शिवभक्त प्रतापगडावरील दर्गा उद्ध्वस्त करतील ! - प्रा. आबदेव
30-03-2008
हिंदूंना अशी भाषा करायला लावणार्या हिंदुद्वेष्ट्या दोन्ही काँग्रेसच्या सरकारला सत्तेवरून पायउतार करा !
सांगली, ३० मार्च (वार्ता.) - प्रतापगडावर अफझलखानाच्या कबरीशेजारी असलेले बेकायदेशीर दर्ग्याचे बांधकाम पाडण्यात यावे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतरही दोन्ही काँग्रेसच्या आघाडी सरकारने या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही.
(न्यायालयाचा आदेशही धाब्यावर बसवणारे दोन्ही काँग्रेसचे कायदाद्रोही आघाडी सरकार ! असे सरकार केवळ अराजक माजवील, यात शंका नाही ! - संपादक) सरकारने कारवाई केली नाही, तर शिवभक्तच हा दर्गा उद्ध्वस्त करतील, असा इशारा विश्व हिंदु परिषदेचे प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी दिला. ते सांगली येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असतांना पत्रकारांशी बोलत होते. (केवळ मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठीच न्यायालयाचा आदेश असतांनाही बेकायदेशीर बांधकाम तोडण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. या मुसलमानधार्जिण्या सरकारला धडा शिकवण्यासाठी हिंदूंना स्वत:ची मतपेढी तयार करण्याशिवाय पर्याय नाही! - संपादक) प्रा. आबदेव म्हणाले, ``हे बांधकाम पाडण्यात यावे, यासाठी विहिंपने न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर न्यायालयाने हे बांधकाम पाडण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. हे बांधकाम पाडण्यासाठी शासनाला आम्ही ३० जूनपर्यंत मुदत देत आहोत. या दिवशी न्यायालयाच्या निर्णयास सहा महिने पूर्ण होतील. तोपर्यंत सरकारने कोणतीही कारवाई न केल्यास `सरकारलाच अफझलखानाचे स्मारक हवे आहे', हेच सिद्ध होईल. यानंतर महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त हे बांधकाम उद्ध्वस्त करतील.''धर्मरक्षणासाठी `धर्मसंसदे'ची स्थापना !हिंदूंमध्ये धर्मजागृती व्हावी व त्यांना कार्य करण्यासाठी दिशा मिळावी, यासाठी विहिंप काय करत आहे, असे विचारल्यावर प्रा. आबदेव म्हणाले, ``हिंदु धर्माचे रक्षण होण्यासाठी विंहिपने दिल्ली येथे १९८४ साली `धर्मसंसद' स्थापन केली. या संसदेत भारतातील सर्व धर्माचार्य, संत व महंत यांना एकाच व्यासपिठावर आणण्यात येते. `धर्मसंसद' निर्णय घेते व विहिंप त्यानुसार निर्णय घेते. धर्मांतरित झालेल्या हिंदूंना हिंदु धर्मात आणण्यासाठी विहिंप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. विहिंप २५ हजार संस्कारवर्ग चालवते व २५ हजार सेवा प्रकल्प राबवते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment