हिंदुद्वेष्ट्या अकबराचा उदोउदो करणारा `जोधा अकबर'


इतिहासतज्ञांनाही विवाहातील `मांगल्य' कळले नाही !इस्लामी बखरींतील `विवाह' या शब्दाला अनेक इतिहास संशोधक फसले, हे दाखवतांना ओक लिहितात, `श्रीवास्तव म्हणतात की, जैसलमीरचा राजा रावल हररायाने स्वत:च्या कन्येचा `विवाह' अकबराशी लावला. येथे `विवाह' हा शब्द अयोग्य आहे, हे त्यांच्या लक्षात कधीच आले नाही.' कन्येला जैसलमीरहून आणण्यास राजा भगवानदास गेला. त्याने त्या असाहाय्य राजकन्येस अकबराच्या जनानखान्यात आणून पोचती केली. यावरून जैसलमीरच्या राजघराण्यातून तिला कोणी पोहोचवले नाही. बकासुराला रोज एक माणूस व गाडाभर अन्न खायला लागे, त्यातलाच हा प्रकार होता. लढून वा न लढता भेदरून शरण येणार्‍या प्रत्येक हिंदु वा मुसलमान राजा-नबाब-सुलतान इत्यादींस अकबराच्या राक्षसी कामवासनेच्या तृप्‍तीपायी स्वत:ची कन्या अर्पण करावीच लागे. अकबरासारख्या शक्‍तीमान सम्राटाशी टक्कर देऊन नेस्तनाबूत होण्यापेक्षा आपल्या कुलस्त्रिया व संपत्ती देऊन समेट करणे बरे, असे भगवानदास, मानसिंह इत्यादी अकबराचे दास बनलेले राजपूत इतरांना समजावत. त्यानुसार उदयपूरचा महाराणा सोडून जवळजवळ अन्य सर्व संस्थानिक लढा देऊन वा लढाई न करता अकबरास शरण गेले. शरण जाताच एकाच राजकन्येला अर्पण करून भागत नसे. डोल्या भरून अन्य स्त्रियाही नेल्या जात. आहेर जसा एका परिवारातील अनेकांना त्यांच्या प्रतिष्ठेनुसार वेगवेगळा दिला जातो, तसेच अकबराच्या सेनेतील अनेकांना हिंदु स्त्रिया डोलीत घालून दिल्या जात. या हिंदु स्त्रियांची बालकेच इस्लामी वातावरणात हिंदूंचा आत्यंतिक तिरस्कार करण्याचे बाळकडू पिऊन हिंदूंच्या कत्तलीचा, बाटवेगिरीचा, बलात्काराचा इस्लामी वारसा पुढे चालवत.

पृष्ठे २१३-२१५ वर श्रीवास्तव म्हणतात, `बांसवाडा संस्थानाचा राजा रावलप्रताप व डोंगरपूरचा राजा रावल असकर्ण यांस अकबराचे अधिपत्य मान्य करण्यास प्रवृत्त करण्यात आले. तेव्हापासून ते अकबराचे अंकित जहागीरदार मानले गेले. डोंगरपूरची राजकन्याही अकबराच्या जनानखान्यात धाडण्यात आली. त्या दोघा हिंदु नरेशांना लूणकर्ण व बिरबल यांनी अकबराशी समेट करण्यास प्रवृत्त केले. डोंगरपूरची राजकन्या त्या दोघांनी आणून अकबराच्या डेर्‍यात रुजू केली. अकबर त्या वेळी दरमजल दरकूच करत फत्तेपूर सीक्री येथे परत येत होता. अशा प्रवासातही अकबराच्या आसुरी वासनेला हिंदु राजस्त्रियांचा सतत पुरवठा होतच होता. या वेळेसही पित्याच्या प्रेमळ संरक्षणातून खेचून डोंगरपूरच्या राजकन्येस त्रयस्थ व्यक्‍तींनीच अकबराच्या डेर्‍यात पोहोचवली.' हिंदूंमध्ये विवाह हा एक संस्कार आहे. यातील मांगल्यच अकबराने धुळीला मिळवले !आप्‍तेष्टांसाठीही अकबर हिंदु स्त्रियांना मागून घेई ! श्री. ओक यांनी अकबराच्या दरबारी त्याचे आश्रित असलेल्या व त्याचे पाय चाटणार्‍या धर्मांध बखरकारांनी लिहिलेल्या वर्णनांमधून योग्य निष्कर्ष कसा काढावा, हे शिकवले आहे. श्री. ओक लिहितात, `पराजित शत्रूंच्या स्त्रियांची अकबरास स्वत:साठी अभिलाषा असे. एवढेच नव्हे, तर पुत्रपौत्रादी जवळच्या सर्व आप्‍तेष्टांसाठीही तो परस्त्रिया मागून घेई. उदा. छोट्या तिबेट प्रदेशाच्या शासकास त्याची कन्या शहाजादा सलीम (जहांगीर)च्या जनानखान्यात धाडण्यास सांगण्यात आले. त्यानुसार १ जानेवारी १५७२ रोजी लाहोर नगरीत ती कन्या मोगल जनानखान्यात प्रविष्ट करण्यात आली. सुखासुखी आपली कन्या व्यभिचारी, व्यसनी मोगली जनानखान्यात कोण पोहोचवील ? यावरून निष्कर्ष हा निघतो की, कन्येसह अन्य भरपूर धनदौलत दिली नाही, तर `हल्ला करून तुझे इवलेसे राज्य इस्लामी अत्याचारांनी चिरडून टाकू', असा दटावणीचा निरोप छोट्या तिबेटच्या राजाला गेल्यावरच त्याने स्वत:च्या कन्येच्या अब्रूचा बळी दिला. २६ जून सन १५८६ ला लाहोरात बिकानेरच्या रायसिंहाची कन्याही सलीम (जहांगीर)च्या नावे भाळीचे हिंदु कुंकू पुसून इस्लामी जनानखान्यात प्रविष्ट झाली. या घटनांना इतिहासतज्ञ `विवाह' म्हणत आले आहेत, ते सर्वस्वी चूक आहे. तो विवाह असता तर तो वधूगृही बिकानेरच्या राजवाड्यात संपन्न झाला असता. हा लाजीरवाणा प्रकार बिकानेरात झाला असता, तर तेथील समस्त हिंदु जनतेने कठोर निर्भत्सना केली असती !शेलट यांनी `अकबर' नावाच्या ग्रंथात सलीम (जहांगीर)शी झालेल्या दोन हिंदु राजकन्यांच्या विवाहाचा (?) उल्लेख केला आहे. ते म्हणतात की, २ फेब्रुवारी १५८४ रोजी लाहोर नगरीत बर्‍याच धामधुमीने राजा भगवानदासाच्या कन्येशी सलीमचा विवाह संपन्न झाला. तसेच सन १५९६ च्या जून महिन्यात रायसिंहाच्या कन्येशी सलीमचा विवाह लावण्यात आला. या विवाहाच्या समयीचा आनंदोत्सव मोगल मुसलमान पक्षाकरवी होणे स्वाभाविकच होते; कारण हिंदु राजकन्या भ्रष्टावणे त्यांचे ब्रीदच होते. हिंदु पक्षाला मात्र रडून आकांत करण्याएवढे हे दु:खद प्रसंग होते. कारण अनेक मुसलमान सवती असलेल्या जनानखान्यात, बुरखा व पडद्याच्या अंधारात, दारूड्या व व्यसनी मुसलमान नवर्‍यासह जीवन कंठावे लागणे म्हणजे नरकवासच होता. शिवाय हिंदूंना हीन समजून उठता बसता मुसलमानांकरवी होणारा छळ व शिवीगाळही हिंदु राजकन्यांना सहन करावी लागे. भगवानदास व मानसिंह हे जयपूरचे राजपुत्र अकबराचे हस्तक झाल्यापासून त्या दोघांच्या मध्यस्थीने अन्य राजपूत राजकन्या मोगली जनानखान्यात प्रविष्ट केल्या जात. त्या कन्यांच्या मातापित्यांना कन्या मोगलांच्या हवाली करणे म्हणजे मरणांतिक दु:खाचा प्रसंग असे. म्हणून ते स्वत: न येता भगवानदास व मानसिंह यांस मध्यस्थ करत. त्यांस तेवढेच अंतिम समाधान की, निदान एका हिंदु राजपुत्राकरवी आपली कन्या (इस्लामी नरकात) धाडली गेली. नरकाच्या द्वारात शिरतांना निदान काही हिंदु शब्द व आश्‍वासने तरी तिच्या कानावर पडतील !' जोधाबाई मेल्यानंतर राजपुतांनी क्षौरकर्म करण्याचे नाकारले ! आता श्री. ओक यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेली जोधाबाई मेल्यानंतरची एक घटना पाहू. कर्नल जेम्स टॉडच्या 'ींर्हर्हीत्े र्ीह् र्ींहूग्िल्ग्ूगे दि र्ींीर्रीेूर्प्ीह' (भाग २, पृष्ठ ३८५) मध्ये दिले आहे, `जोधाबाईचा मृत्यू झाला तेव्हा सर्व राजपुतांनी क्षौर (डोक्यावरील केस व दाढी इ. वस्तर्‍याने काढून) करावे, अशी अकबराने आज्ञा दिली. त्या आज्ञेचा भंग होऊ नये म्हणून सरकारी न्हावी बोलावण्यात येऊन त्यांना अकबराच्या दरबारातील सर्व राजपूत पुरुषांचे क्षौर करण्यास सांगण्यात आले. ते न्हावी बादशहाच्या आज्ञेनुसार जेव्हा हाडा राजपुतांच्या छावणीत पोहोचले, तेव्हा त्यांनी स्वत:ची हजामत करून घेण्याचे नाकारून न्हाव्यांना मारहाण केली. विरोध करणार्‍यांमध्ये एक राजा भोज होता. रणथंभोर किल्ला ज्याची राजधानी होती, त्या राव सुरजनचा भोज हा पुत्र होता. भोजाचे जे हितशत्रू होते त्यांनी अकबराकडे कागाळी केली की, जोधाबाईचे सुतक म्हणून हाडा राजपुतांनी बादशहाने धाडलेल्या न्हाव्यांकडून क्षौर करून घेण्यास साफ नकार देऊन न्हाव्यांना हाणामारी व धाकदपटशा करून पिटाळून लावले. भोज हा शूरवीर होता. नाईलाजाने अकबराच्या दरबारी एक ओलीस म्हणून अन्य अनेक हिंदु राजकुमारांप्रमाणे रहाणे त्यास भाग पडले होते. भोजाच्या विरोधाची वार्ता ऐकताच अकबराने हुकूम सोडला की, राजा भोजाला बेड्या घालून त्याच्या मिशा उतरवाव्यात. ही बातमी हाडा राजपुतांच्या छावणीत पोहोचताच ते संतप्‍त झाले. सर्वांनी बंड करण्याची तयारी केली. त्यांच्या तलवारी बाहेर निघाल्या. यावर अकबराला स्वत: तेथे येऊन समेट करावा लागला अन् राजपुतांच्या अक्षरश: केसालाही हात लावण्याची अकबराची छाती झाली नाही. या घटनेतील गोम अशी होती की, जोधाबाई ही जयपूरच्या राजपूत राजघराण्यातली होती. तिला उचलून अकबराच्या जनानखान्यात नेल्यापासून ती राजपुतांना मेल्यागतच झाली होती. म्हणून अत:पर ती राजपूत नाही व कोणत्याही सन्मानास ती पात्र नाही, असा त्यांचा बाणा होता. त्यानुसार ती वारली तरी क्षौरकर्म व अन्य सुतक परंपरा पाळणे राजपुतांना मान्य नव्हते. आमच्या मनाविरुद्ध आमची हजामत करवणारा अकबर कोण मोठा लागून गेला ? शिवाय तो ठरला मुसलमान, असे भोजाला वाटले. मिशी हे प्रत्येक राजपुताच्या इभ्रतीचे, मानाचे व पौरुषत्वाचे लक्षण समजले जाई. स्वत:ची मिशी अबाधित राखण्यास्तव प्राणही देण्याची त्यांची तयारी असे. उलट राजपुतांची सर्व प्रकारे मानहानी करण्याचा, त्यांचे ब्रीद नष्ट करण्याचा, त्यांना अपमानित करण्याचा व त्यांना सर्वतोप्रकारे लाचार करण्याचा अकबराने चंग बांधला होता. इतरांनी नतमस्तक होऊन सदैव आपल्या आज्ञेत रहावे, असा अकबराचा कटाक्ष असे. आपली बटीक झाली म्हणून जोधाबाईस हीन समजून सुतकाचे क्षौरकर्म राजपुतांनी करू नये, ही गोष्ट अकबरास मोठी मानहानीकारक वाटली होती; म्हणून त्याने छलाबलाने त्यांचे क्षौर करण्याचा घाट घातला होता. पण तो पार फसला !' मुसलमानाला मुलगी द्यायची कल्पना आजही किळसवाणी !हिंदी चित्रपटसृष्टीला सर्व मुसलमान पात्रे आणि त्यांचे वर्तन सोज्वळच दाखवायची खोड गेल्या साठ वर्षांत लागली आहे. आता तर अकबरासारख्या अत्यंत दुराचारी राजाचेही उदात्तीकरण करण्यात येत आहे. अकबराचा मृत्यू होऊन ४०२ वर्षे झाली आहेत. काळ एवढा पुढे गेला, तरी आजही कोणताही हिंदु बाप आपली कन्या मुसलमानाला द्यायचे मनातही आणणार नाही. हिंदु अंत:करणाला आजही ती कल्पनाही किळसवाणी वाटते, तर तेव्हाची काय कथा ? गल्लाभरू निर्मात्याने रंगवलेल्या खोट्या इतिहासाला प्रमाण मानून मोठ्या पडद्यावरील अकबराची तथाकथित प्रेमकहाणी खरी मानायची कि ऋषीतुल्य व्यक्‍तीने सांगितलेला साधार इतिहास सत्य मानून आपले राष्ट्र व धर्म, तसेच माता-भगिनींचे रक्षण करायचे, हे आता हिंदु समाजानेच ठरवावे ! (समाप्‍त)

No comments: