हिंदवी स्वराज्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध

हिंदवी स्वराज्याचा पूर्वार्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी व उत्तरार्ध संभाजी महाराजांनी रचला ! - पू. संभाजी भिडेगुरुजी

पुणे, २३ मार्च (वार्ता.) - हिंदवी स्वराज्याचा पूर्वार्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी व उत्तरार्ध छ. संभाजी महाराजांनी रचला या दोघांचीही विचारसरणी कृतीत आणल्याशिवाय भारताचा हिंदुस्थान होणार नाही, असे परखड मत पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी भोसरी, पुणे येथे व्यक्‍त केले.
पू. भिडेगुरुजी
शंभुभक्‍त मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त पू. भिडेगुरुजींचे व्याख्यान श्री नागेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी `संभाजी महाराजांच्या चरित्राचा संश्लेषणात्मक मागोवा' या विषयावर पू. भिडेगुरुजी बोलत होते. पू. गुरुजी पुढे म्हणाले, ``शिवछत्रपतींना महाराष्ट्राने ओळखले असते, तर देशाचा भूतकाळ व वर्तमानकाळ वेगळा असता. या देशात इंग्रजांचे राज्य आले नसते, रायगडावर रोप-वे झाला नसता, पन्हाळयावर लोकांनी शेण खाल्ले नसते, रायगडावर बाटल्या सापडल्या नसत्या. शिवछत्रपतींबद्दल महाराष्ट्राला इतके प्रेम आहे, तर संभाजी महाराजांबद्दल किती असेल'', असा परखड प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शिवछत्रपती सूर्य होते, तर संभाजी महाराज सूर्य आणि लावारस यांचा मिलाप होते. शिवरायांनी आपल्या छत्तीस वर्षांच्या कारकीर्दीत निर्माण केलेले स्वराज्य संभाजी महाराजांनी अवघ्या पावणेनऊ वर्षांच्या कारकीर्दीत सव्वापट वाढवले. हिंदवी स्वराज्याचा वारसा जपणार्‍या शिवछत्रपतींनी जगण्याचा व संभाजी महाराजांनी धर्मासाठी मरण्याचा मंत्र दिला; मात्र संभाजी महाराजांच्या जीवनाचा अंतर्गाभा पुढच्या पिढीपर्यंत साहित्यिक पोहोचवू शकले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्‍त करून ते म्हणाले, ``शिवाजी पितापूत्र या देशातील इस्लामी दहशतवादाशी लढले; मात्र आपण सर्वधर्म समभाव मानून आपल्या पापावर शाब्दीक शाली व झालरी पांघरत आहोत. हा देश नपुसंकत्वाचा भार करायचा नसेल, तर देशातील दहशतवादाचे बीज काढून टाकले पाहिजे, तरच भारत येत्या काही वर्षांत हिंदुस्थान म्हणून ओळखला जाईल.''

3 comments:

Anamika Joshi said...
This comment has been removed by the author.
Dr.Chinmay Kulkarni said...

छान ब्लॉग आहे!!!!
विदुशी अस कुठ म्हटल आहे भिडे गुरुजींनी???स्वत:च्या मनाच कशाला घुसडताय???हे भिडे गुरुजी काही कुणी लोकल नेता वगैरे नाहीत

Anamika Joshi said...
This comment has been removed by the author.