हा देश हिंदूंचा कि देशद्रोही मुसलमानांचा

हा देश हिंदूंचा कि देशद्रोही मुसलमानांचा ! - ह.भ.प. आंधळे महाराज
19-05-2008

बीड, १९ मे (वार्ता.) - हिंदुस्थानवर मोगलांचे राज्य असतांना त्यांनी हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस केला. हे सत्य कीर्तनकारांनी कीर्तनात सांगितले, तर त्यांच्यावर कलम १४९ अन्वये कारवाई करण्याची धमकी पोलीस देतात. कीर्तनकारांना रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकावर कीर्तन करण्याची बंदी पोलीस घालतात; पण मशिदींवर रात्री १० नंतरही भोंग्यातून अजान दिलेली त्यांना चालते. यावरून या देशात राज्य हिंदूंचे कि देशद्रोही मुसलमानांचे, असा संतप्‍त प्रश्‍न ह.भ.प. अजिनाथ आंधळे महाराज यांनी केला. माणिक दौंडी, तालुका पाथर्डी, जिल्हा नगर येथील महादेव मंदिरात नुकत्याच आयोजित केलेल्या कीर्तनात ते बोलत होते.
ह.भ.प. आंधळे महाराज कीर्तनात पुढे म्हणाले, ``एप्रिल २००८ मध्ये एका मुसलमानाने संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या ८० व्या वर्षी लिहिली, असे वक्‍तव्य केले. या मुर्खाच्या बोलण्याने समस्त हिंदू व वारकरी यांच्या धर्मभावना दुखावल्या. अशा मुर्खांनी आमच्या संतांवर चिखलफेक करू नये अन्यथा आमच्या भगव्या झेंड्याच्या काठीची त्यांच्या पाठीशी गाठ पडेल'', असा इशारा त्यांनी दिला. गोमातेच्या रक्षणाबाबत ते म्हणाले, ``कसायाच्या हातातील गाय वाटेल त्या मार्गाने सोडवा. विरोध झाला, तर तो करणार्‍याला त्याची जागा दाखवून द्या.''

No comments: