जगद्‌गुरु श्रीकृष्णाची भक्‍ती करणार्‍या `इस्कॉन'वाल्यांना हे शोभते का ?

जगद्‌गुरु श्रीकृष्णाची भक्‍ती करणार्‍या `इस्कॉन'वाल्यांना हे शोभते का ?
24-06-2008

हिंदुद्रोही चित्रपट `दी लव्ह गुरु'ला `इस्कॉन'चा पाठिंबा !
उत्तर अमेरिका, २४ जून (वृत्तसंस्था) - हिंदु धर्मातील गुरु-शिष्य नात्याला बदनाम करणारा हिंदुद्रोही चित्रपट `दी लव्ह गुरु'ला जगभरातील हिंदूंकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर काल `इस्कॉन'च्या उत्तर अमेरिका शाखेने या चित्रपटाला पाठिंबा जाहीर करणारे पत्र प्रसिद्ध केले. (भरकटलेली `इस्कॉन' ! `इस्कॉन'सारख्या एका आध्यात्मिक संप्रदायाला सदर चित्रपटातून हिंदूंच्या श्रद्धेचे विडंबन होत असल्याचे कळत नाही, ही बाब हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती अनिवार्य बनले आहे, हे स्पष्ट करते ! - संपादक) या पत्रामुळे `दी लव्ह गुरु'ला विरोध करणार्‍या जगभरातील हिंदूंमध्ये आश्चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. `दी लव्ह गुरु' हा चित्रपट संपूर्णपणे पाहिल्यानंतर त्यातील प्रसंगांचा हेतू हिंदूंच्या भावना दुखावण्याचा नसल्याचे स्पष्ट होते. (जर हिंदूंच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, तर जगभरातील हिंदूंकडून विरोध होऊनही ते प्रसंग संबंधितांनी का काढले नाहीत ? `खून करण्याचा माझा हेतू नव्हता; म्हणून मला निर्दोष मुक्‍त करावे', असे एखाद्या खुन्याने सांगितले, तर त्याला कुणी कधी निर्दोष म्हणेल का ? - संपादक) `दी लव्ह गुरु' या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करणे किंवा त्यावर बंदी घालणे, याच्या `इस्कॉन' विरोधात आहे.हिंदु-अमेरिकन लोकांनी हा चित्रपट केवळ विनोदी चित्रपट म्हणून पहावा व आपल्या श्रद्धेचे व्यापकत्व दाखवावे. (यात कसले आले आहे श्रद्धेचे व्यापकत्व ? उद्या `इस्कॉन'वाल्यांच्या आई-वडिलांची कुणी टिंगल केली, तर त्याकडे ते विनोद म्हणून पाहून हसतील का व `आम्ही व्यापक आहोत', अशी स्वत:ची पाठ थोपटून घेतील का ? - संपादक) चित्रपट निर्मात्यावर दबाव आणून त्याच्या कलात्मक स्वातंत्र्यावर घाला घालून त्याला कथा बदलायला लावणे किंवा चित्रपटात काटछाट करायला लावणे, हे वैदिक हिंदु धर्मातील संवेदनशीलतेच्या विरोधात आहे. (कलात्मक स्वातंत्र्याच्या आडून हिंदूंच्या धर्मश्रद्धांची पायमल्ली होत असेल, तर ते रोखणे, हे धर्मकर्तव्य आहे व धर्मकर्तव्य न बजावणे, हा धर्मद्रोह आहे ! - संपादक) काही चित्रपट आपल्या भावना दुखावत असल्याचे आम्ही मान्य करतो; मात्र `दी लव्ह गुरु' हा चित्रपट त्यांतील नाही, असा निर्वाळा `इस्कॉन'ने सदर पत्रात दिला आहे. (धर्मभावना दुखावल्या म्हणून लढणार्‍या संघटनांशी `इस्कॉन'ने संपर्क साधला असता, तर तिला सत्य कळले असते ! - संपादक) `बर्‍याच संघटना त्यांच्या परंपरा व भावना यांचा वापर विनोदासाठी करण्याविषयी संवेदनशील असतात. `दी लव्ह गुरु' हा चित्रपट त्याच संघटनांना संयम राखून कधीतरी हसण्यासाठी वेळ काढायला शिकवतो', असे पाठिंबा पत्रात शेवटी म्हटले आहे. (हसण्यासाठी गुरु-शिष्य परंपरेचे विडंबनच कशाला हवे ? जगातील समस्त अन्य विषय संपले का ? - संपादक)

No comments: