भारतियांनी धूम्रपान करू नये, यासाठी बिल गेट्स यांचा पुढाकार

भारतियांनी धूम्रपान करू नये, यासाठी बिल गेट्स यांचा पुढाकार
स्वत:च्या देशात न चालणारे उत्पादन भारतात आणून खपवणार्‍या अमेरिकन कंपन्यांना भारतात पाय रोवू देणार्‍या आत्मघातकी राज्यकर्त्यांना जनतेने हटवायला हवे
29-07-2008


न्यूयॉर्क, २८ जुलै - भारत व चीन येथे धूम्रपानविरोधी मोहिमेसाठी जगप्रसिद्ध संगणकतज्ञ बिल गेट्स व न्यूयॉर्क शहराचे महापौर मिशेल ब्लुमबर्ग यांनी ५०० मिलियन डॉलरची मदत जाहीर केली आहे. अमेरिकेत धूम्रपानाच्या आहारी गेलेल्यांची संख्या कमी झाल्यानंतर अमेरिकेतील सिगारेट निर्मिती करणार्‍या मोठमोठ्या कंपन्यांनी विकसनशील देशांना लक्ष्य केले आहे.
(भारतीय राज्यकर्ते याबाबत काय करणार आहेत ? स्वत:च्या देशात न चालणारे उत्पादन भारतात आणून खपवणार्‍या अमेरिकन कंपन्यांना भारतात पाय रोवू देणार्‍या आत्मघातकी राज्यकर्त्यांना जनतेने हटवायला हवे. - संपादक) धूम्रपानाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी व या षडयंत्राच्या विरोधात जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बिल गेट्स व न्यूयॉर्क शहराचे महापौर मिशेल ब्लुमबर्ग यांनी वरील मदत जाहीर केली आहे.

No comments: