गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या

हिंदूंनो, अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या ! - आचार्य धर्मेंद्रजी महाराज
अखंड भारताचे स्वप्न पहातांना पाक व बांगला येथील मुसलमान डोईजड होणार नाहीत, असे पहा !
15-08-2008

मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) - मातेचे विभाजन कधीच होत नसते. हजारो वर्षांची मंदिरे व मूर्ती उद्ध्वस्त करणार्‍या मुसलमान आक्रमकांनाही भारतमातेचे विभाजन करता आले नाही; परंतु माऊंटबॅटनच्या पत्‍नीच्या प्रेमाखातर जवाहरलाल नेहरू आणि विश्‍वासघातकी गांधी यांनी काही तासांत भारताचे विभाजन करून पाकिस्तानची निर्मिती केली. आता पुन्हा `अखंड भारता'च्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या, असे आवाहन हिंदु धर्मप्रसारक आचार्य धर्मेंद्रजी महाराज यांनी येथे केले.

हिंदु मानवाधिकार मंचातर्फे काल जोगेश्‍वरी येथे `अखंड भारत संकल्पदिना'च्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आचार्य धर्मेंद्रजी महाराज हे प्रमुख वक्‍ते म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी मंचाचे प्रमुख कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, जोगेश्‍वरी येथील संघचालक श्री. जगदीश सामंत, प्रसिद्ध उद्योजक श्री. गोयंका आदी मान्यवर उपस्थित होते. आचार्य धर्मेंद्रजी महाराज पुढे म्हणाले, ``संपूर्ण विश्‍व हा एक परिवार आहे. `वसुधैव कुटुंबकम्' असा विचार फक्‍त भारतमातेने दिला आहे. या भूमीला लाखो वर्षांचा इतिहास आहे. या एवढ्या प्रदीर्घ इतिहासामधील `१४ ऑगस्ट १९४७' हा दिवस अत्यंत दुर्दैवी दिवस ठरला. या दिवशी भारतमातेचे तुकडे झाले. फाळणीला विरोध करणार्‍या गांधींनी विरोधासाठी एक दिवसही उपोषण केले नाही; मात्र फाळणीनंतर पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी उपोषण करण्याची धमकी दिली. अशा गांधींवर `दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुनें कर दिया कमाल' असे काव्य रचून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे बलीदान मातीमोल ठरवण्यात आले आहे. आता पुन्हा `अखंड भारता'च्या निर्मितीच्या संकल्पपूर्तीसाठी एक फुंकर मारून विझणारे दिवे बनू नका, तर न विझणारी ज्वाळा बना.
''जम्मूतील हिंदूंची लढाई भारतप्रेमी व भारतद्रोही यांच्यामधील आहे !
जम्मूमधील हिंदूंनी जी लढाई सुरू केली आहे, तिच्यामागे श्री अमरनाथ देवस्थान मंडळासाठीच्या जमिनीचा मुद्दा हा निमित्तमात्र आहे. खरी लढाई ही भारतपे्रमी व भारतद्रोही यांच्यामधील `आर-पार की लडाई' आहे. ही लढाई विजय व विनाश यांमधील आहे. जम्मूतील हिंदूंनी जो अत्याचार सहन केला आहे, त्याचा रोष हा या लढाईतील शक्‍तीस्रोत आहे. राहिलेला काश्मीरही जाण्याच्या मार्गावर असतांना दुर्दैव आहे की, भारताच्या इतर ठिकाणच्या हिंदूंना त्याचे सोयरसुतक नाही. ते खाण्यापिण्यात व मौजमजा करण्यात दंग आहेत. असेच सुरू राहिले, तर अखंड भारत कसा होणार, असा प्रश्‍न आचार्य धर्मेंद्रजी यांनी विचारला. ``ही धर्म-अधर्माची लढाई आहे. पाकिस्तान हा देश नष्ट होणारच आहे. ईश्‍वराने ते आधीच केले आहे'', असेही आचार्य धर्मेंद्रजी महाराज म्हणाले.
हिंदुहितासाठी केवळ जगद्‌गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि `सनातन प्रभात' कृतीप्रवण आहे !
कार्यक्रमाच्या पूर्वी आयोजित केलेल्या वार्तालापामध्ये आचार्य धर्मेंद्रजी महाराज म्हणाले, ``सध्या हिंदूंच्या हितासाठी किती जण प्रामाणिकपणे कार्य करत आहेत ? केवळ जगद्‌गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि `सनातन प्रभात' यांच्याशिवाय दुसरे कोणीच काही करत नाही.''

No comments: