राजापूर (जिल्हा सातारा) येथे अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची विटंबना

राजापूर (जिल्हा सातारा) येथे अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची विटंबना
हिंदूंनो, रात्र नव्हे, दिवसही वैर्‍याचा आहे, हे लक्षात घ्या !
25-07-2008

सातारा, २५ जुलै (वार्ता.) - खटाव तालुक्यातील राजापूर येथे श्री वेताळबाबा मंदिरातील पाषाणांच्या मूर्तींची अज्ञात व्यक्‍तींकडून तोडफोड करण्यात आली आहे, अशी माहिती पुसेगाव पोलिसांनी दिली.
(अशी विटंबना अन्य पंथियांच्या बाबतीत घडली असती, तर काय झाले असते ? हिंदूंमध्ये धर्मप्रेम जागवण्यासाठी धर्मशिक्षणाला पर्याय नाही ! - संपादक)याबाबात अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील राजापूर गावाजवळील राजापूर-जरांबी रस्त्यावर श्री वेताळबाबा मंदिर आहे. या मंदिरातील पाषाणांच्या मूर्तींची अज्ञात व्यक्‍तींनी तोडफोड केल्याचे लक्षात आले आहे. ही घटना १९ जुलै रोजी रात्री घडल्याचा अंदाज आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी राजापूरचे सरपंच श्री. संपतराव मदने यांच्या ते लक्षात आले. त्यांनी तातडीने याबाबत ग्रामस्थांना कल्पना देऊन पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. अज्ञात व्यक्‍तीने तीनपैकी दोन मूर्तींचे दोन तुकडे केले आहेत, अशी नोंद पोलीस ठाण्यात आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली असून साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. के.जी. शिंदे पुढील तपास करत आहेत.

No comments: