लाहोरच्या कतास राज मंदिरातील अनेक मूर्ती पळवल्या

लाहोरच्या कतास राज मंदिरातील अनेक मूर्ती पळवल्या
08-07-2008

पाकिस्तानमध्ये हिंदूंची मंदिरे संकटात !
लाहोर, ७ जुलै (वृत्तसंस्था) - लाहोरपासून सुमारे ४० किलो मीटर अंतरावर असलेल्या कतास राज येथील श्री रामचंद्र मंदिरातील अनेक मूर्ती चोरांनी पळवल्या आहेत. सध्या या मंदिरात फक्‍त शिव-पार्वतीची कोरीव मूर्ती शिल्लक असून तीपण चोरीला जाण्याची शक्यता आहे. सर्प मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराला आवश्यक सुरक्षा न पुरवल्याबद्दल या मंदिराचे पंडित जावेद अक्रम कुमार यांनी पंजाब पुरातत्व खात्याला दोष दिला. (मंदिरांच्या रूपाने पाकिस्तानमध्ये अस्तित्वात असलेली हिंदु संस्कृती मुळासकट निपटून काढण्यास निघालेले पाकमधील मुसलमान ! - संपादक) कतास राज येथील श्री रामचंद्र मंदिर ही सर्वांत पुरातन वास्तू आहे. त्या ठिकाणी पूर्वी संस्कृत विद्यापीठ होते, असे कुमार यांनी सांगितले.

No comments: