तामिळनाडूमधील नेल्लाईप्पार मंदिर उडवण्याची धमकी

तामिळनाडूमधील नेल्लाईप्पार मंदिर उडवण्याची धमकी
02-08-2008

हिंदूंनो, मंदिरांचे रक्षण करा !
तिरूनेलवेली - येथील नेल्लाईप्पार मंदिरावर बाँबहल्ला करू, अशी धमकी देणारे पत्र मंदिराच्या अधिकार्‍यांना पाठवण्यात आले आहे. शेख दाऊद या नावाने पाठवण्यात आलेल्या या पत्रात `नेल्लाईप्पार व इतर चार मंदिरे यांवर बाँबहल्ला करू', असा मजकूर आहे. या धमकीमुळे मंदिरांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी चेन्नई येथे बाँबस्फोट घडवून आणण्याचा कट रचणार्‍या अब्दुल गफूर, महंमद कासीम आणि अली अब्दुल्ला या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेचा या पत्रातून निषेध करण्यात आला आहे. मंदिराचे प्रमुख अधिकारी श्री. जी. शण्मुगदैवानायागम यांना हे धमकीचे पत्र मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तूर्तास मंदिराच्या परिसरात कोणताही स्फोटक पदार्थ सापडलेला नाही.

No comments: