काश्मीरमध्ये १२ महिला दहशतवाद्यांना अटक

काश्मीरमध्ये १२ महिला दहशतवाद्यांना अटक
24-04-2008

श्रीनगर, २४ एप्रिल (प्रे.ट्र.) - `मुस्लीम खावातीन मर्कझ' या महिला दहशतवादी संघटनेच्या १२ दहशतवाद्यांना आज येथे अटक करण्यात आली. संसदेवरील हल्ल्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या महंमद अफझल याला सोडून देण्याची मागणी करत या संघटनेच्या ५० महिला दहशतवाद्यांनी आज शहरातील लालचौकात मोर्चा काढला होता.
राज्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून या महिला दहशतवाद्यांनी मोर्चा काढल्याचे पोलिसांनी सांगितले. (केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या नाकर्तेपणापुढे याहून दुसरे काय होणार ? अफझलची फाशी स्थगित ठेवली तेव्हाच पुढे काय होणार हे ठरले होते. त्याच्या सुटकेसाठी मुसलमानांकडून येणार्‍या दबावासमोर काँग्रेसचे सरकार टिकणार का ? - संपादक)

No comments: