धर्मराव अत्राम यांना अटक का केली नाही

धर्मराव अत्राम यांना अटक का केली नाही ? - एकनाथ खडसे
24-07-2008


मुंबई, २४ जुलै (वार्ता.) - वन्यप्राण्यांची शिकार केली म्हणून चित्रपट अभिनेता सलमान खान, तसेच नवाब मलिक यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली; मात्र आपल्या मंत्रीमंडळातील राज्यमंत्री श्री. धर्मरावबाबा अत्राम यांचा चिंकार्‍याची शिकार केल्याप्रकरणी राजीनामा घेण्यात आला. मात्र त्यांना आदिवासी व पक्षाचे आमदार म्हणून अटक केली नाही.
(असे पक्षपाती शासन जनतेचा विश्‍वास कसा संपादन करणार ? - संपादक) त्यांना मोकळे का सोडले आहे ? मोठ्यांना एक कायदा, तर इतर लहानांना एक कायदा असा फरक का, असा प्रश्‍न विचारत श्री. अत्राम यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी भाजपचे गटनेने आमदार श्री. एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षनेते श्री. रामदास कदम, शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार श्री. गजानन किर्तीकर यांनी आज कायदा व सुव्यवस्था या विषयावर नियम २९३ अन्वये चर्चा उपस्थित केली होती. या वेळी श्री. खडसे पुढे म्हणाले की, केवळ मुंबईत १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत खून, दरोडे, खंडणी, घरफोड्या, बलात्कार यांतून ८ हजार २८१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. भिवंडी येथे दोन पोलिसांना अमानुषपणे मारण्यात आले. तेथे पोलीस ठाणे बांधण्यासाठी सर्व परवानग्या आहेत व अर्थसाहाय्यही आहे. असे असतांनाही मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी बांधकाम सुरू होत नाही का ? गृहमंत्र्यांच्या राज्यात जनता तर नाहीच; पण पोलीस व लोकप्रतिनिधीही सुरक्षित नाहीत. विष पिऊन, गळफास लावून, रेल्वेखाली येऊन ४० पोलिसांनी आत्महत्या केल्या. `पोलीस गृहनिर्माण'मध्ये उघडी गटारे, डास, माशा असतात. त्यातच पोलीस रहातात. (पोलिसांना अशा अस्वच्छ ठिकाणी रहावे लागते, याची कायम सोयीसुविधा उपभोगणार्‍या गृहमंत्र्यांना कल्पना आहे का ? - संपादक)गृहमंत्रीजी, होत नसेल तर घोषणा करू नका - खडसे श्री. रा.रा. पाटील यांनी गृहमंत्रीपद मिळाल्यापासून आतापर्यंत ६४ आश्‍वासनांच्या माध्यमातून घोषणा केल्या आहेत. यात प्रथम गुटखाबंदी, तंटामुक्‍त गाव मोहीम, डान्सबारबंदी आदी घोषणा केल्या. या घोषणांनंतर पोलीस लहान गुन्ह्यांची नोंद करून घेत नाहीत. डान्सबार बंदीची घोषणा करूनही दररोज वर्तमानपत्रातून धाडी टाकल्याच्या बातम्या येतात. गृहमंत्रीजी, होत नसेल, तर घोषणाबाजी करू नका, असा सल्ला श्री. एकनाथ खडसे यांनी आज दिला.

No comments: