जम्मूमध्ये हिंदूंच्या उद्रेकामुळे बेमुदत काळासाठी संचारबंदी लागू

जम्मूमध्ये हिंदूंच्या उद्रेकामुळे बेमुदत काळासाठी संचारबंदी लागू
24-07-2008


श्री अमरनाथ देवस्थान जमीन हस्तांतर प्रकरण !
जम्मू, २४ जुलै (वृत्तसंस्था) - श्री अमरनाथ देवस्थानाला दिलेली जमीन परत घेतल्याबद्दल निषेध व्यक्‍त करण्यासाठी जम्मूमधील कुलदीप या युवकाने आत्महत्या केली आहे. या तरुणाच्या आत्महत्येनंतर भाजप, शिवसेना, विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला असून त्यांचा थेट पोलिसांशी संघर्ष सुरू झाला आहे. आज श्री अमरनाथ संघर्ष समितीच्या आत्महत्या करणार्‍या या कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी समितीने राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचे ठरवले होते.
त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून सरकारने जम्मूमध्ये बेमुदत काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. जमीन हस्तांतर प्रकरणी जबाबदार असलेले राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी या संघर्ष समितीने केली आहे. श्री अमरनाथ देवस्थानला दिलेली जमीन परत घेतल्याबद्दल अनेक हिंदू संघटनांनी संताप व्यक्‍त केला आहे. अब्दुल्ला यांच्या वक्‍तव्यावर भाजपची टीकाजम्मू - संसदेत विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी अमरनाथ देवस्थान जमीन प्रकरणावर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्‍तव्यावर भाजपने टीका केली आहे. भाजपचे नेते श्री. अशोक खाजुरिआ पत्रकारांना म्हणाले, ``ओमर अब्दुल्ला यांच्या `काश्मिरी मुसलमान त्यांच्या जमिनीसाठी लढा देत आहेत व तो पुढेही चालू राहिल' या वक्‍तव्यामुळे देशातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. अब्दुल्ला व इतर अनेक काश्मिरी नेते हुरियत कॉन्फरन्सच्या विघटनवादाला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या वक्‍तव्यामुळेच कुलदीपकुमार डोग्रा याने आत्महत्या केली आहे व जम्मूमधील हिंदू हे सहन करणार नाहीत.''

No comments: