ताजमहाल शिवमंदिर असल्याचा दावा करत शिवसैनिक ताजमहालमध्ये घुसले

ताजमहाल शिवमंदिर असल्याचा दावा करत शिवसैनिक ताजमहालमध्ये घुसले
24-07-2008

-->
नवी दिल्ली, २४ जुलै (प्रे.ट्र./ वृत्तसंस्था) - ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे सांगत आज शिवसैनिकांनी ताजमहालच्या परिसरामध्ये पूजा केल्याचा दावा केला; मात्र या वृत्ताचा ताजमहालची सुरक्षाव्यवस्था पहाणार्‍या व्यवस्थापनाने नकार दिला.








आमयाचे पोलीस अधीक्षक श्री. रघुवीर लाल म्हणाले, ``शिवसेनेचे स्थानिक नेते श्री. वीरू लबानिया यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ताजमहालच्या परिसरात जाण्यासाठी तिकिट खरेदी केले.'' उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक श्री. ब्रीज लाल म्हणाले, ``श्री. लबानिया यांच्यासमवेत पाच कार्यकर्ते व २ महिला कार्यकर्त्या होत्या. ते सर्व वास्तूच्या बाहेर आले; मात्र त्यांनी आतमध्ये पूजा केली नाही. ताजमहालची सुरक्षाव्यवस्था पहाणार्‍या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची श्री. लबानिया व इतर कार्यकर्त्यांवर बारीक नजर होती.'' श्री. लबानिया यांनी ताजमहालच्या बाहेर आल्यावर त्यांनी ताजमहालमध्ये पूजा केल्याचा दावा केला. ``श्री. लबानिया यांनी पूजा करण्यासाठी कोणतेच साहित्य नेले नव्हते. त्यामुळे त्यांनी पूजा केली नाही, अशी माहिती श्री. ब्रीज लाल यांनी दिली. ``ताजमहालमध्ये पूजा करण्यात आलेली नाही'', अशी माहिती उत्तरप्रदेशचे गृहसचिव श्री. महेशकुमार गुप्‍ता यांनी दिली. ताजमहालला भेट देणारे सातही जण शिवसैनिक होते. ताजमहालच्या परिसरातून बाहेर आल्यावर या कार्यकर्त्यांनी त्यांचे एकत्रित छायाचित्र काढले. ``हे सर्व घडतांना सुरक्षाजवान तेथे उपस्थित होते. तेथे पूजा करण्यात आलेली नाही. ताजमहालच्या परिसरात पूजा झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांना अटक करण्याचा प्रश्‍नच नाही'', असे श्री. ब्रीज लाल म्हणाले.
ताजमहालचा मुद्दा शिवसेनेच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही - खासदार संजय राऊत ताजमहालमध्ये प्रवेश करण्याच्या प्रकाराची आग्रा येथील शिवसैनिकांनी वरिष्ठांना माहिती दिलेली नव्हती. या प्रकरणाची आपण चौकशी करत आहोत, असे वक्‍तव्य शिवसेनेचे खासदार व `दैनिक सामना'चे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी `झी' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. `ताजमहल ही भारताची ऐतिहासिक वास्तू असून त्याला कोणत्याही धर्माशी जोडू नये', असे ते म्हणाले.
ताजमहल नव्हे, शिवालय आणि तोच तेजोमहालय !ताजमहाल म्हणजे शिवालय असल्याचा दावा आश्चर्यचकित करणारा नाही. ताजमहाल म्हणजे शिवालय आहे, असे सांगणारे शिवसैनिक एकटेच नाहीत. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहासाचे संशोधक कै. पु.ना. ओक यांनी तर या विषयावर `ताजमहाल तेजोमहालय आहे' हे पुस्तकच लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी जवळजवळ १२० पुरावे दिले आहेत. ताजमहाल ऊर्फ तेजोमहालय हा शहाजहानपूर्व हिंदु प्रासाद आहे. शहाजहानने ताजमहाल बांधल्याचा काडीचाही पुरावा नाही. असे असतांनाही अनेक पिढ्यांच्या इतिहासतज्ञांनी केवळ इस्लामी थापांची शहनिशा न करता री ओढली आहे !
ताजमहाल शिवमंदिर असल्याचे पुरावे !ताजमहाल ही इस्लामिक वास्तू नसल्याच्या पु.ना. ओक यांनी दिलेल्या पुराव्यांपैकी काही निवडक पुरावे जुजबी बदल करून येथे देत आहोत.
१. `ताजमहाल' हा शब्दच मुळी शहाजहान व औरंगजेब यांच्या दरबारी कागदपत्रात वा समकालीन बखरीत उल्लेखित नाही. कारण तो `तेजोमहालय' असा संस्कृत शब्द आहे. कडवे मुसलमान संस्कृत शब्दांचा उल्लेख जाणूनबुजून टाळतात.
२. विश्‍वकर्मा वास्तूशास्त्रात पंचमहाभूतागणिक शिवलिंगाचे पृथ्वीलिंग, आकाशलिंग, वायूलिंग, आपलिंग व तेजोलिंग असे पाच प्रकार नमूद आहेत. भारतातील सर्व प्रसिद्ध प्राचीन शिवक्षेत्रांत वरीलपैकी कोणत्या प्रकारचे लिंग प्रस्थापित आहे, ते भक्‍तांनी व प्रेक्षकांनी स्थानिक पुजारी इ. जाणकार व्यक्‍तींकडून ज्ञात करून घ्यावे. आमयास तेजोमहालयात शिवाचे तेजोलिंग होते, हे त्या नावावरून स्पष्ट आहे. आग्रा हे नगर व ती वास्तू त्यांतील तेजोलिंगासाठी पूर्वापार प्रसिद्ध होती, हे पीटर मंडी या आंग्ल व बर्निए या फ्रेंच प्रवाशांच्या नोंदीवरून स्पष्ट आहे.
३. आमयात जाट लोकांची वस्ती आहे. ते लोक शंकराला तेजाजी म्हणतात. त्यांचे ते तेजोमहालय होते.
४. आमयातील कर्मठ लोक श्रावणमासातील सोमवारी पूर्वापार पाच स्थानिक शिवलिंगांचे दर्शन घेऊन उपवास सोडीत. त्यातील पृथ्वीनाथ, बलकेश्‍वर, राजराजेश्‍वर व मनकामेश्‍वर अशा चारांचेच दर्शन घेऊन आधुनिक पिढ्यांना समाधान मानावे लागते. पाचवे शिवमंदिर कोणते, याचे ज्ञान काळाच्या ओघात नष्ट झाले. ते पाचवे प्रसिद्ध, पवित्र शिवक्षेत्र तेजामहालय होय.
५. गेली ३५० वर्षे जगातील कोट्यवधी प्रेक्षकांनी प्रवेश-शुल्क देऊन ताजमहाल पाहिला. तरी ताजमहालातील नक्षीकामात ॐ, शंखाकृती पाने, नागयुगले, त्रिशूळ, कमळे, घुमटावरील नारळाकृतीने मंडित सुवर्णकलश, थडग्याभोवतीच्या जाळीवरील कलश इ. वैदिक चिन्हे स्वत:ही पाहिली नाहीत व सरकारमान्य स्थलदर्शकांनीही (guides) त्यांना ती दाखवली नाहीत. यावरून ऐतिहासिक वास्तूंचे निरीक्षण-परीक्षण किती आंधळेपणाने चालते ते दिसते, तसेच पुरातत्वविद, इतिहासतज्ञ व अन्य विद्वानही ऐतिहासिक वास्तू किती उथळपणे पहातात, ते दिसते. एकूण ऐतिहासिक वास्तूंची बारकाईने पाहणी न करणे, बखरीतील उल्लेख जनतेपासून लपवून ठेवणे अथवा त्यांचा अर्थ फिरवून जनतेची दिशाभूल करणे, असे घोर अपराध आजवरचे पदवीप्राप्‍त अधिकारी इतिहासतज्ञांकडून झाले आहेत.
६. शहाजहानच्या क्र. २ च्या राणीचे नाव मुमताझ्-उल-झमानी असे कागदोपत्री नोंदलेले आहे. तरीही तिचे नाव मुमताझमहल होते, असा इतिहासतज्ञांनी खोटा डांगोरा पिटून त्या इमारतीचे नाव ताजमहाल पडले, ते मुमताझमहल त्यात पुरली आहे म्हणून, अशी सर्वांची फसवणूक केली. तिचे नाव मुमताझमहलच होते, असे जरी घटकाभर धरून चालले तरी त्यातील पहिली दोन `मुम' ही अक्षरे वगळून उरलेली पाच अक्षरे (ताजमहाल) हे इमारतीचे नाव उरते, हे कोठल्या तत्त्वान्वये ?
७. मुमताझचे प्रेत ताजमहालात पुरले तरी आहे कि नाही, या बाबतीत नि:पक्षपणे शोध घेणे आवश्यक आहे. कारण ती बुर्‍हाणपूर नगरी वारली होती व सहा महिने तिला तेथे पुरलेही होते. शहाजहानास खरोखर ताजमहाल बांधायचा असता, तर तो त्याने बुर्‍हाणपुरातील मुमताझच्या कबरीवर बांधला असता. सहा महिने जमिनीत कुजलेले प्रेत काढून कोणी अन्यत्र उकरून नेत नाही.

No comments: